अँबुलन्सचे दर है किलोमीटर नुसार प्रशासनाने ठरवून द्यावे अशी मागणी मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी केली आहे.
ठाणे : गेल्या दीड महिन्यात ठाण्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रूग्णालयातील सुविधा अपुऱ्या पडत असताना मात्र दुसरीकडे अॅम्ब्युलन्सच्या सेवेत रूग्णांची लूट केली जात असल्याची बाब पुढे येत आहे. महापालिकेची ठराविक रूग्णालय असल्यामुळे खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेणाऱ्या अॅम्ब्युलन्ससाठी अवाच्या सवा भाडे आकारले जात आहे.
महापालिका आणि शासनाने नियुक्त केलेल्या रूग्णालयात मर्यादित सुविधा असल्याने ठाण्यातील खासगी रूग्णालयचा शोध घेण्यासाठी धडपड करावी लागत आहे. पण खासगी रूग्णालय याचा फायदा उठवित अॅम्ब्युलन्सच्या सेवेत लूट सुरू आहे. लॉकडाऊन असल्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. पण रूग्णवाहिकाही कमी पडत असल्याचे माहिती पुढे येत आहे. तर १०८ ची सुविधा ही केवळ सरकारी रूग्णालयांकरिता असल्यामुळे खासगी रूग्णालयात रूग्णांना नेले जात नाही. याचा फायदा उठवित अॅम्ब्युलन्ससाठी अधिक भाडे आकारले जात आहे, यावर प्रशासनाने वेळीच यावर नियंत्रण आणण्याची मागणी मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी केली.
करोनाबाधित रूग्णांना खासगी रूग्णालयातील अॅम्ब्युलन्सच्या सेवेससाठी ११ ते १५ हजार मोजावे लागत आहेत. केवळ तीन किलो मीटरचे अंतर असतानाही कार्डिकसाठी १५ हजार तर कोव्हीडसाठी ११ हजारांचे दर आकारले जात असल्याचे अनुप देशमुख यांनी सांगितले तसेच हाच प्रसंग झोंबाडे परिवारावर पण ओढवला जेव्हा त्यांना त्यांचा पोराला हॉस्पिटल ते घरी आणायचे होते . करोनाचे कारण पुढे करून अॅम्ब्युलन्स चालकांकडून रूग्ण असो किंवा मृतदेह नेण्यासाठी लूट सुरू केली आहे. जवळच्या अंतरासाठी रूग्णांना रूग्णालयात पोहचण्यासाठी अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून हजारो रूपये आकारून सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जात आहे. यावर वेळीच प्रशासनाने कारवाई करावी तसेच अँबुलन्सचे दर है किलोमीटर नुसार प्रशासनाने ठरवून द्यावे अशी मागणी मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी केली आहे.
466 total views, 1 views today