म्युनिसिपल लेबर युनियनची मागणी
ठाणे : मधुमेह, ह्रदय विकार, दमा आणि इतर आजार असलेल्या महापालिकेतील ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याची मागणी म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवीराव यांनी आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.
ठाणे महापालिका हद्दित कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या इतकी झाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच महापालिका कर्मचारी कोरोनाविरुध्दच्या लढाईत नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी झटत आहेत. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवीराव यांनी आयुक्त विजय सिंघल यांना पत्र पाठवून काही मागणी केल्या आहेत. त्यामध्ये जे कर्मचारी ५५ वर्षावरील आहेत व त्यांना मधुमेह, ह्रदय विकार, दमा व इतर आजार आहेत, अशा कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी. तसेच ५५ वर्षावरील इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाशी संबंधित कामकाज न देता त्यांना इतर काम देण्यात यावे, अशाप्रकारची मागणी करण्यात आली आहे. तसेच याबाबत तातडीने निर्णय घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
620 total views, 1 views today