मुख्यमंञी सहाय्यता निधीला ठाणे परिवहन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची एक लाख ५१ हजारांची मदत

पतसंस्था संचालकांनीही संस्थेचा मासिक वैयक्तिक सभाभत्ता मुख्यमंञी सहाय्यता निधीला प्रदान केला.

जिल्हाधिकार्‍यांकडे केला धनादेश सुपूर्त

ठाणे : कोरोनाविरोधातील राज्यसरकारच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी ठाणे परिवहन कर्मचारी सहकारी पतसंस्थेने १ लाख ५१ हजारांची मदत मुख्यमंञी सहाय्यता निधीला केली. पतसंस्थेचे अध्यक्ष तथा टीएमटी एम्पलाॅईज युनियनचे खजिनदार मनोहर जांगळे यांनी या मदतीचा धनादेश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार राजाराम तवटे यांना सुपूर्त केला. यावेळी सचिव भास्कर पवार, संचालक दिलीप चिकणे, कैलास पवार, व्यवस्थापक दीपक दळवी आदी उपस्थित होते. यासोबत पतसंस्था संचालकांनी संस्थेचा मासिक वैयक्तिक सभाभत्ता मुख्यमंञी सहाय्यता निधीला प्रदान केला. राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे कोरोना विरोधातील लढ्यात उतरले आहेत. आरोग्यमंञी राजेश टोपे, शिवसेना नेते, जिल्ह्याचे पालकमंञी एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्केदेखील सर्व पातळीवर कोरोनाशी दोन हात करत आहेत. त्यामुळे या कार्यात ठाणे परिवहन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचाही वाटा असावा, म्हणूनच ही मदत केल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष मनोहर जांगळे यांनी सांगितले

 698 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.