‘ मी सतीश चाफेकर ‘…ज्यावेळी मला चेहरा नव्हता त्यावेळच्या आठवणी…5

काल कॉंक्रिटची सर्व तयारी करून घरी गेलो.
आज सकाळी दिवस रात्र काम चालणार म्हणून तयारी करून आलो…
साइटवर लांबून बसमधून गर्दी दिसली , मला वाटले काम सुरु झाले. जवळच बसने उतरलो तेव्हा जिथून कॉंक्रिट सुरु होणार होते त्या शटरिंगच्या सपोर्टमध्ये एक ऍम्ब्युलन्स घुसलेली होती. आत कोणी नव्हते अपघात रात्री दोन च्या सुमारास झाला होता, एक ऍम्ब्युलन्स पेशंट शकट त्या सपोर्टसाठी लावलेल्या लोखंडी स्टँडवर घुसली होती यामुळे काही सपोर्ट निघाले होते तर काही वाकडे झाले होते. सगळे मुसळ केरात कारण सपोर्ट परत लावणे , लेव्हल इन्स्ट्रुमेंट लावून चेक करणे मग क्लायंट करून ओके करू घेणे सर्व सोपस्कार आलेच म्हणजे दोन दिवस कॉंक्रिट पुढे जाणार. नशीब त्या पेशंटला आणि इतरांना इजा झाली नाही. चिंता होती डॉक्टर पण येणार , काय होईल त्याचा नेम नाही. तासाभरात डॉक्टर आले त्यांना सर्व प्रसंग दोन्ही साहेबानी सांगितला. डॉक्टर पटेल वरून शांत होते परंतु वैतागलेले असणार कारण शटरिंग लावायला खूप वेळ खाल्ला होता आणि कॉंक्रिट झाल्याशिवाय कुठलाही क्लायन्ट पेमेंट देत नसतो हे सर्वाना माहित असते.
दोन दिवसानी काम सुरु होणार जाहीर झाले, सगळे लेबर, स्टाफ, त्यांची साधने आमचा कॉंक्रिट बॅचिंग प्लान्ट सर्व रेडी काम सुरु होणार डॉक्टर पण होते तितक्यात कॉंक्रिट मिक्स डिझाईन कोण बघणार म्हटल्यावर मला पुढे केले. मी गुप्तां यांनी माहीत होतो त्यांनी ज्या पाण्याने कॉंक्रिट करणार त्या पिपाजवळ आले . गुप्ताने विचारले पाणी चांगले आहे. मी हो म्हणालो तशी तो म्हणाला ती ये पाणी पियो , आयचा घो पाणी चांगले म्हणालो होतो, कुठल्या टँकरने कुठून आणले कोण जाणे, पेला मागवला मी पाणी प्यायलो . गुप्ता म्हणाले अच्छा है, मला झक मारत हो म्हणावे लागले, नाहीतर सगळे काम लटकले असते. मी अच्छा है म्हणालो तशी तो म्हणाला तुम ये पाणी पी सकते हो काम शुरु करो…आणि काम सुरु झाले..सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अर्थात गुप्ता बारा गावचे पाणी प्यालेला होता माझ्या मनात काय आहे ते त्याने ओळखले होते परंतु तो आमची परीक्षा बघत होता…आणि आम्ही त्यात पास झालो होतो.मग कामाने वेग घेतला, जेव्हा काँक्रेट नसेल तेव्हा क्यूब चेक करणे, अशी अनेक कामे असत परंतु लवकर ६ वाजले की बेलापूर ठाणे एस टी धावत जाऊन पकडायची कारण दर अर्ध्या तासाने बस होती.दिवस जात होते धमाल मात्र काँक्रिटच्या वेळी येत असे. एरवी साईट मोठी असल्यामुळे इथे तिथे भटकायचे. त्यावेळी जरा लांबवर ताडीची झाडे होते त्याला मटकी लटकवलेली होती जे मुरलेले होते एक राउंड मारून यायचे , सगळे गाववाले ओळखीचे झाले होते. कंटाळा आला तर गावातल्या बस स्टॅण्डवर जायचे, कटींग पिऊन परत गप्पा मारत यायचे. अर्थात साइटवर झोपडीवजा कॅन्टीन होते एकदा गम्मत झाली. सकाळी घाईघाईने जेवणाचा डबा उचलला, दुपारची वेळ होती , डबा उघडला तर आत मळलेली पोळ्याची कणिक होतो त्यावेळी फोन वगैरे काही ननव्हते शिव्या पडणार करायचे काय. झोपडी वजा कॅंटीनमध्ये गेलो एका दगडावर बाटलीने कणकेची पोळी करण्याचा प्रयत्न केला कारण तेथे लाटणे नव्हते. दुसर्याकडून झोपडीतून आणणे सुचले नाही जेमतेम दोन पोळ्यात आमचा स्टॅमिना संपला मग त्या चहाबरोबर खाल्ल्या. सगळ्यांनी शिव्या घातल्या घरी आल्यावर आईच्या शिव्या पडल्या त्या वेगळ्या.एके दिवशी काँक्रीट जोरात चालू होते, सकाळपर्यंत चालणार याची कल्पना होती. सकाळची ११ ची वेळ होती एक लेबर बाई आली साहेब ५० रुपये द्याल का मुलाला दूध मागवते त्यावेळी ती काम करत होती काम स्पीडमध्ये होते, कोणीही थांबवू शकत नव्हते . मी ५० रुपये दिले तशी म्हणाली शाम को या रात को देगी , मी संध्याकाळपर्यंत ते विसरून गेलो. रात्रीचे दहा वाजले . तितक्यात आमचा टिपर ड्राइवर माझ्याकडे आला चाफेकर तू चुत्या आहेस , काय झाले अरे त्या बाईला तू सकाळी ५० रुपये दिलेस ना , ती तुला कितीवेळ खुणा करून बोलवत होती, मी म्हणालो नाही रे खरेच माझे लक्ष नव्हते …तशी तो जवळ येऊन डोळा मारून म्हणाला…तेरा ५० रुपया मै वसूल करके आया.मला लक्षात आले हा काम करून मोकळा झाला…माझ्या मनातही नव्हते …मी डोक्याला हात लावला..थोड्यावेळाने ती माझ्या जवळून गेली…ओझरते माझ्याकडे तिने पाहिले..

आयला मला दरदरून घामच फुटला….

सतीश चाफेकर.

 662 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.