त्या दांपत्याने कोरोनावर मात करीत केली घरवापसी

प्रशासनाने आखून दिलेले नियम पाळण्याचे केले आवाहन

ठाणे  : माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे ठाणो शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल यांनी जीवघेण्या कोरोनावर यशस्वी मात करीत घर वापसी केली आहे. या १४ दिवसांच्या कालावधीत मुलांची खुप आठवण येत होती असे त्यांनी सांगितले. मंगळवारी रात्री या दांपत्याच्या दोन टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांची घर वापसी झाली. घरी परतल्यावर सोसायटीमधील सर्वच नागरीकांनी त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत केले.
ठाणो शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना आता या संसर्गावर मात करीत घरवापसी घेणा:यांची संख्याही वाढत आहे. राष्ट्रवादीचे जवळ जवळ १२ पदाधिकारी आता कोरोनावर मात करुन घरी सुखरुप परतले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नीने देखील आता कोरोनावर मात करीत घरवापसी केली आहे. गत १४ एप्रिलला ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांना दोन लहान मुले आहेत, त्यांची दोन वेळा टेस्ट करण्यात आली. दोनही वेळेला टेस्ट निगेटीव्ह आली. तसेच त्यांच्या घरातील अन्य एका सदस्याची देखील टेस्ट करण्यात आली, ती देखील निगेटीव्ह आली. त्यामुळे त्यांच्या मुलांचा योग्य रितीने सांभाळ या व्यक्तीनेच केल्याचे परांजपे यांनी सांगितले. मागील १४ दिवसात अनेक विचार डोक्यात घोंगावत होते. त्यात मुलांची काळजी जास्त सतावत होती. परंतु त्यांचा सांभाळ योग्य झाला आणि आम्ही देखील आता यातून पूर्णपणो बरे झालो असल्याचेही माहिती परांजपे यांनी दिली. मंगळवारी रात्री उशिरा आम्हाला डिसार्च देण्यात आला. त्यानंतर सोसायटीमध्येही आमचे मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. टाळ्यांच्या गजरात स्वागत पाहून आम्हालाही खुप बरे वाटले. असा आजार कोणालाही होऊ नये हीच प्रार्थना या निमित्ताने करीत आहे.
एकूणच प्रशासनाने जे काही नियम घालून दिले आहेत, त्याचे सर्वाना पालन करावे, पोलीसांना सहकार्य करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये अशी विनंती या निमित्ताने समस्त ठाणोकरांना करीत असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

 791 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.