कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विशेष पथकाद्वारे सर्वेक्षण करण्याचे आयुक्तांचे आदेश
ठाणे : वागळे प्रभाग समितीमधील झोपडपट्टी व दा़टलोकवस्तीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी बाधित परिसराचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले असून पाच विविध पथकांच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू झाले आहे. दरम्यान या परिसरात रँडम टेस्टींग करण्याचे आदेशही सिंघल यांनी दिले आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी काल वागळे प्रभाग समितीमधील अनेक ठिकाणी पाहणी केली होती. या परिसरात झोपडपट्टी आणि दाट लोकवस्ती असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच परिसरात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी बाधित परिसराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार वागळे प्रभाग समिती परिसरात सी. पी. तलाव, भटवाडी, किसननगर, पडवळनगर परिसरात या पाच विविध विशेष पथकांच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
सदरचे सर्वेक्षण ज्या ठिकाणी बाधित रूग्ण सापडले आहेत त्या परिसरातील नागरिकांनाच्या रँडम पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यामार्फत कोरोनाच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. वागळे प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच परिसरातील कोरोना संसर्ग नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने ही विशेष मोहीम रावबविण्यात येत आहे.
509 total views, 1 views today