आरएसएस व भारत विकास परिषद घोडबंदर शाखेचा उपक्रम
ठाणे : मनोमन नगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारत विकास परिषद घोडबंदर शाखा यांच्याकडून ठाणे शहरातील गरजू साठी सामूहिक किचनची सुरुवात आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केली. सुरुवातीला संपूर्ण हॉल व किचन सनिटेशन करण्यात आला. शिवाय भाज्यांसाठी व्हेजिटेबल वॉश (भाजी सनिटेशन) करूनच नंतर जेवण तयार केले गेले. सर्व प्रकारची स्वच्छता घेऊन व निर्जंतकीकरण करून जेवण तयार केले जाते. या कम्युनिटी किचन च्या उद्घाटनप्रसंगी मानपाडा नगराचे नगर संघचालक एडवोकेट प्रभाकर जोशी, श्रीकांत देशपांडे, संजीव अगरवाल,सुरेश पिल्ले, भारत विकास परिषद घोडबंदर चे अध्यक्ष सुरीन उसगावकर, मधू नारायणन उन्नी, जयंत कुमार व लेवा पाटीदार समाज चे प्रमुख देवराज पटेल उपस्थित होते व या किचनद्वारे ८०० पाकिटे वाटण्याची योजना आहे असे कम्युनिटी किचन चे प्रमुख दत्ता घाडगे यांनी सांगितले.
583 total views, 1 views today