कोरोनाविरुद्धच्या लढाईत ठाणेकरांचा असहकार

प्रशासनाला सहकार्य करा महापौरांचे आवाहन

ठाणे : ठाणे शहराच्या विकासामध्ये आजपर्यंत ठाण्यातील तमाम नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य या कोरोनाच्या युद्धामध्ये आम्हाला आपले हवे आहे. पण दुर्दैवाने म्हणावेसे वाटते, या युद्धामध्ये ठाणेकर म्हणावे तसे अजूनही सहकार्य करत नाही. ठाण्यातील मुंब्रा, कळवा वागळे इस्टेट असे कितीतरी भाग आहेत या भागात टाळेबंदीचे नियम काटेकोरपणो नागरीक पाळत नाहीत. रस्त्यावर फिरत आहेत, कोणत्यातरी शुल्लक कारणास्तव सुशिक्षित नागरिक देखील रस्त्यावर दिसत आहेत. कधी आले, लिंबू आणण्याचे कारण, तर कधी फिरण्याच्या हेतुने मेडिकल मधून फेअर अँड लवली घेवून बाहेर पडतात, यातून दुर्दैवाने टाळेबंदीची शिस्त मोडते आहे. हे सगळं करून काय साध्य होणार आहे बाबांनो? तर आपल्या मरणाला आपणच आमंत्रण देत आहोत. त्यामुळे आता तरी सावध व्हा आणि प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणोकरांना केले आहे.
ठाणो शहरातील माङया भावा बहिणींनो, माङया बांधवांनो, मातांनो, माङया तमाम ठाणोकरांनो. मी अत्यंत नम्रपणो, आपल्याला दोन्ही हात जोडून विनंती करतो आहे, कृपया टाळेबंदीचे नियम काटेकोरपणो पाळा. ठाणो शहर हे मुंबईच्या हद्दीवर आहे, मुंबईत जसा कोरोनाचा प्रसार वाढतो आहे, तसाच ठाणो शहरातही आता वाढू लागला आहे. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होवू लागला आहे. महापालिकेने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन न केल्यामुळे कोरोना कम्युनिटी स्प्रेड होवू लागला आहे. जर अजूनही अशीच बेफिकीरी तुम्ही दाखवली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. तुमच्या सेवेसाठी डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी, ठाणो महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी हे अहोरात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून ते काम करीत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस स्वत:च्या परिवारापासून दूर राहून सेवा देत आहेत, त्यांना सहकार्य करणो गरजेचे आहे, ती सुद्धा माणसे आहेत, त्यांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, ते ही कधीतरी थकू शकतात, मग तुम्ही काय करणार आहात? आज कम्युनिटी स्प्रेडच्या स्टेजला आपण आहोत म्हणून आता खरी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

 419 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.