पाण्यासाठी ठाकुरवाडीतील आदिवासींची वणवण

लवकरच पाणी पुरवठा करण्याचे शिवसेनेचे आश्वासन

बदलापूर : बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील मोहपाडा या आदिवासी वस्ती च्या बाजूला लागून असलेल्या ठाकुरवाडी आदिवासी पाड्यावरील 55 घरांमध्ये राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना जीवन जगण्या बरोबरच पाण्यासाठी देखील वणवण भटकंती करावी लागत आहे. लवकरच पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी या आदिवासी वस्तीमधील महिलांना दिले आहे.
शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी या परिसरातील नागरिकांना महिनाभर पुरेल इतके अन्न धान्याचे वाटप नुकतेच केले. यावेळी येथील महिलांनी अन्नधान्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानताना आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पाण्याची टाकी बांधून द्या अशी विनंती केली. पाणी नसल्याने येथे जीवन जगणे बरोबरच महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. बदलापूर नगरपालिकेला लागुनच असलेला हा भाग असल्याने नगरपालिकेने या सर्व नागरिकांची व्यवस्था करावी अशी मागणी येथील आदिवासी महिलांनी वामन म्हात्रे यांच्याकडे केल्यावर वामन म्हात्रे यांनी येत्या एक ते दोन दिवसातच या ठिकाणी दहा हजार लिटरची पाण्याची टाकी व नळ कनेक्शन देण्याचे आश्वासन येथील महिलांना दिले.
बदलापूर आणि परिसरातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने अनेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आता उन्हाळा देखील सुरू झाल्याने गावाजवळ असलेले जलस्त्रोत आटले आहेत. बदलापूर शहराला लागून असलेल्या ठाकूरपाड्ययात लवकरच पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिले आहे.

 519 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.