‘ मी सतीश चाफेकर ‘…ज्यावेळी मला चेहरा नव्हता त्यावेळच्या आठवणी….

बेलापूर साईटवर असताना खरे तर खरी कसोटी होती. सगळे वेगळे वातावरण , गाववाले, तेथील वातावरण हे सर्व आम्हाला नवीन होते असे नाही परंतु एक चॅलेंन्ज होते कारण कुठली अडचण कधी , कशी येऊ शकते आणि त्याला कसे तोड द्यायचे हे शिकलो ..खरे सांगू ह्या नोकरीमुळे जगात काहीही अशक्य नाही फक्त पेन्शन्स हवे , हे पेशन्स आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे मी या नोकरीत शिकलो बाकी पगार वगैरे दार नव्हता. काम तेव्हा भरपूर काम नाही तर वाचन किंवा मिळालेल्या संधीचा कसा फायदा घेणे कुणालाही त्रास न देता, त्यात एम ए चे शिक्षण चालू होते. मला वाटते शेवटचे वर्ष असेल , एक्सटर्नल अभ्यास करत होतो.वेळ मिळाला की वाचन. बी. ए , च्यावेळी भांडुप साईटला होतो. मराठी विषय होता, वाचन तर होत असे. सर्व पीरिअड्स अटेंड करता येत नव्हते . मग मुलीच्या नोट्स घरी न्यायच्या आणि त्यांच्या नोट्स मोठ्या टेंपरेकॉर्डवर रेकॉर्ड करून एक दिवसात वही परत द्यायची. त्याही खुश वही लवकर परत दिली म्हणून आणि माझेही काम होत असे. मी तसा कॉलेज अटेंड करत नसे , मधून मधून करत असे. त्यावेळी मी बी. ए . पास झालो त्याआधी बी. कॉम पण झालो होतो. बी. ए . ला सुरवातीला ज्ञानसाधना कॉलेजला होतो प्रवीण दवणे , अशोक बागवे शिकवण्यास होते. प्रवीण तर मित्रच होता. अशोक बागवे पण होते, ते ओळखीचे होते. पण त्याच्या तासाला जास्त अटेंड राहिलो नाही. फुकट माझ्या तोडून काही शब्द निघाले तर. एकदा शेण खाल्लेच अशोक बागवे शिकवत होते, मी अशोक म्हणून काहीतरी विचारले, झाले सगळे हैराण . मला माझी चूक मग समजली. चूप राहिलो. शेवटच्या वर्षी परत ठाणा कॉलेजला परत आलो. मग त्या मुलीच्या नोट्स घेऊन जाणे तो प्रसंग त्या वेळचा आहे. मी ठाणा कॉलेजमधून बी ए पास झालो तेव्हा सगळ्यात हैराण झाले ते आमचे केंदूरकर सर , सिंधू पटवर्धन बाई पण शिकवत होत्या. केंदूरकर सर पण. केंदूरकर सरांसमोर बोलायचे म्हणजे भयानक होते तोलून मापून बोलावे लागे कारण शब्दाआधी त्यांची नजरच फटके द्यायची. मी पास झाल्यावर ते मला वाटत टीचर्स रूममध्ये दोन वाक्ये माझ्याबद्दल बोलले हे मला कुणीतरी सांगितले , ते शब्द असे होते, ‘ चाफेकर पास झाला म्हणजे एक तर चाफेकर हुशार असणार किंवा युनिर्व्हसिटीचे स्टॅंडर्ड घसरले असणार ‘. असे पुढे अनेक धक्के अनेकांना मी दिले, एक उपद्व्यापी मुलगा पुढे इतके काही करू शकतो हे आजही अनेकांना जुन्या कॉलेज-शाळेमधील मुलांना धक्कादायक वाटते. ते पुढे ओघाने येईलच.तर बेलापूर साईटवर कामे चालू होते. सर्वप्रकाची कामे करत असू . डॉक्टर पटेल साईटवर आठवड्यातून डॉ पटेल दोन -तीनदा येत असत. त्यावेळी ते येणार ते परुळकर यांना कळत असे. परुळकर ज्याप्रमाणे वागत असे तेव्हा कळत आज मोठा साहेब येणार. शक्यतो त्याच्या समोर जायचे नाही हा प्रत्येकाचा शिरस्ता होता. जर काम करत असाल तर बोबाबोब जास्त करायची जेणेकरून त्यांना ऐकायला मिळेल आणि हा काम करत आहे असा त्यांचा समज निर्माण होईल हा त्यांचा कधी गैरसमज जोपासण्यास आम्ही यशस्वी होत असु . जर ते वैतागलेले असतील , मड खराब असेल असतील तर शक्यतो समोर जायचे नाही जर चुकून आलो तर चालण्याचा वेग वाढवायचा जणू काही घाईत आहे ,एकमत आहे असे दिसेल. डॉक्टर पण आमची बारसे जेवलेले होते.त्यांचा कसा आहे हे त्यांचा ड्राइव्हर याच्या एकाच खुणेवरून कळत असे. असे दिवस जात होते. मोठे फुटिंगचे खड्डे खणले जात होते. काही कॉलम उभे रहात होते , माझ्या नशिबात चाळण्या , वजनाचा काटा, क्युबचे मोल्ड , रेतीमधील माती बघण्याचा जार आणि काही साधने होती, सकाळ झाली की रेती , खडी , चाळून मिक्स डिझाईन बनवने , ट्रायल घेणे चालूच होते. खरे तर मी सिव्हिल इंजिनीअर नव्हतो पण शिकलो बुवा डॉक्टर आणि परुळकर यांच्यामुळे. त्यांचा चीफ इंजिनीअर होते सी. एस. गुप्ता एकदम परफेक्ट माणूस म्हणजे आमच्या दृष्टीने खतरनाक. त्यावेळी रेतीमध्ये काही भा आम्ही ग्रीट वापरयाला सुरवात करणार होतो सतत त्याची मिक्स डिझाइन्स बनवावी लागत , त्याचा slump जास्त लागे , म्हणून ऍडमिक्सर टाकावे लगे, परत बाधकाम झाल्यानंतर क्युरिंग कंपाउंड लगे व्हाची सगळी गणिते मी करत असे मार्गदर्शक परुळकर होतेच. त्यावेळी पहिलांदा ग्रीट वापरत होतो बहुतेक त्यामुळे सगळा मामला कडक होता कारण चांगली रेती मिळत नव्हती , शेकडो ट्र्क रेती धुऊन घ्यावी लागे. हे सर्व करून सर्व अँपृव्ह करून घ्यायचे म्हणजे खायचे काम नाही , परत ते गुप्ता आणि रेमिडीओज डोक्यावर बसलेले होते. दोन शटरिंग मध्ये सिमेंटची स्लरी निघू नये म्हणून स्पंज लावले जाई हे स्पंजाचे ढीग आणले जात . मला वाटत्ते त्यावेळी पहिल्यांदा मुंबईमध्ये पहिल्यांदा असे स्पंज लावले गेले आणि काँक्रीटमध्ये डस्ट म्हणजे खडीची म्हणजे दगडाची पावडर वापरली गेली असेल. बरेच काही करून झाले .आणि शेवटी . स्लॅबचे सुरवातीचे पुलाचे शटरिंग झाले, स्टील लागले, रात्री साफसफाई पूर्ण झाली. एकदम सगळे क्लीन कारण एस. सी गुप्ता होते…उद्या कॉंक्रिट होणार ..सर्व तयारी झाली…सगळे घरी उशीरा गेलो तयारी पूर्ण करून….

आणि…..

सतीश चाफेकर

 522 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.