आ.संजय केळकर यांच्या टिमचे होतेय कौतुक
ठाणे: रायगड जिल्ह्यातील रोहा येथे लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या ठाण्यातील रहिवाशास हृदयविकारावरची औषधे वेळीच पोहोच करणाऱ्या आ.संजय केळकर आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ठाण्यातील रहिवासी दिलीप कवितके हे लॉकडाऊन झाल्यापासून रायगड जिल्ह्यातील रोह तालुक्यात अडकून पडले आहेत. गेल्या दहा वर्षांपासुन त्यांना हृदयविकाराचा त्रास आहे. मात्र त्यांना आवश्यक असणारी औषधे रोह्यात मिळत नव्हती, त्यामुळे आरोग्याची मोठी समस्या उद्भवली. ही बाब भाजपा युवा मोर्चाचे ठाणे शहर उपाध्यक्ष निलेश कोळी यांनी आ.संजय केळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. आ. केळकर यांनी वेळ न दवडता बाळाराम खोपकर यांच्या मार्फत आवश्यक औषधे रोहा येथे कवितके यांच्यापर्यंत पोहोचवली. ही औषधे वेळीच पोहोचल्याने कवितके यांच्यावरील संकट टळले. त्यांनी आ.संजय केळकर आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत.
आ. संजय केळकर हे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गरिब आणि गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि जेवणाची पाकिटे वाटप करित आहेत. ठाणे शहरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संस्था आणि कार्यकर्ते विविध माध्यमातून संकटग्रस्तांना दिलासा देण्याचे काम अविरत करत आहेत. अडचणीत असलेले कोरोनाग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि सर्वसामान्य रुग्णांना आ.संजय केळकर यांच्या विविध उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.
554 total views, 1 views today