डोंबिवली पूर्व – पश्चिम जोडणाºया रेल्वे पुलाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष – लॉकडाऊनच्या काळात काम पूर्ण करता येणे होते शक्य

डोंबिवली :सीएसएमटी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर चाळीस वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या आणि सद्यास्थितीत कमकुवत झालेल्या डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्याापही हे काम पूर्ण झाले नसून सध्या सुरू असलेल्या लॉकाडऊनमध्ये हे काम करणे सोयीस्कर असून देखील याकडे रेल्वे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे लॉकाडाऊन संपल्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांना पूर्वेतून पश्चिमेला जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागणार आहे. इतकेच नव्हे तर एकच पुल सुरू असल्याने या पुलावर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे कोरोनासाठी पाळण्यात येणाºया सोशल डिस्टन्सिंग या नियमाचा देखील पुन्हा फज्जा उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
  डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडे असणारा रेल्वे पुल अत्यंत कमकुवत होता. पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली किंवा पुलाखालून एखादी रेल्वे धावली तरी हा पुल कंपन पावत असे. रेल्वे प्रशासनातर्फे या पुलाचा वापर करू नये असे आवाहनही नागरिकांना केले होते. मात्र बा पुल पूर्व पश्चिम जोडणारा असल्याने अनेक नागरिक याच पुलाचा वापर करत. सीएसएमटी येथे कोसळलेल्या पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली. त्यानंतर १ एप्रिल पासून पुलाच्या दुरूस्तीसाठी हा पुल बंद करण्यात आला. यावेळी रेल्वे प्रशासनाने येत्या तीन महिन्यात हा पुल सुरू होईल असे सांगत मधल्या पुलाचा वापर करून सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.  त्यानंतर जवळपास वर्ष झाले तरी या पुलाचे काम पूर्ण झाले नाही. इतकेच नव्हे तर हा पुल बांधण्यासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेणे गरजेचे आहे. सद्यास्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लॉक डाऊन घोषीत केले आहे. त्यामुळे सध्य रेल्वे देखील बंद असून या मार्गावरून रेल्वे कर्मचाºयांसाठी दिवसातून तीन रेल्वे आणि मधूनच एखादी मालगाडी धावत आहे. त्यामुळे आता मेगाब्लॉक घेऊन हे काम करणे खरे तर अगदीच सोपे होते. मात्र या कामाकडे रेल्वे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. लॉकडाऊन संपले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियम निदान काही दिवस तरी पाळावा लागणार आहे. मात्र एकच पुल सुरू असल्याने त्या पुलावर भरपूर गर्दी होते त्यामुळे हा नियम डोंबिवलीकरांना पाळणे कठीण जाणार आहे. सद्यास्थितीत हा पुल बांधण्यासाठी केवळ पोल बांधून ठेवले आहेत. मात्र गर्डर कधी टाकणार हा प्रश्न मात्र अद्याापही अनुत्तरीत आहे. बांधकाम व्यवसायीकांसाठी लॉकडाऊनचे काही नियम शिथील होणार असल्याची चर्चा असून बांधकाम करणाºया कामगारांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून काम करावे असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निदान पुढील पंधरा दिवसात तरी या पुलाचे काम सुरू होणार का असा प्रश्न चाकरमानी विचारत आहेत. इतकेच नव्हे तर पत्री पुल आणि कोपर पुलाचे काम सुरू केले असल्याने पूर्व पश्चिम जोडणाºया पुलाचे काम देखील सुरू करा अशी मागणी देखील केली जात आहे. 

 411 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.