यापूर्वीच्या कोरोना पेशंटचे नातेवाईक : घाबरू नका पण सतर्क रहा
बदलापूर : बदलापूर पालिका हद्दीत चार दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाचे तीन रुग्ण आढळले होते. या तीनही पॉझिटिव रुग्णांचे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना बदलापूर पालिकेने त्याच दिवशी विलगीकरण केंद्रात दाखल केलं होतं. चार दिवसांपूर्वी या सर्वांचे नमुने स्वॅप टेस्ट साठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल गुरुवारी संध्याकाळी पालिकेला प्राप्त झाला असून यातील आठ जण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती नगराध्यक्ष एड. प्रियेश जाधव यांनी दिली आहे. आठ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र सर्वानी घरात राहून सतर्क रहावे असे आवाहन नगराध्यक्ष एड. प्रियेश जाधव यांनी केले आहे.
चार दिवसांपूर्वी जेव्हा कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळले होते तेव्हाच बदलापूर पालिकेने पूर्व व पश्चिमेकडील रुग्ण आढळलेले भाग सील केले होते. तर या रुग्णांचे जवळचे नातेवाईक आणि त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहणारे आपापसातील नातेवाईकांना बदलापूर पालिका प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलं होतं त्यामुळे हे नागरिक अजून कोणाच्या संपर्कात आले नसल्याने मोठा धोका टळला आहे. असे असले तरी हे रुग्ण यापूर्वी ज्यांंच्या संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेण्यास आता बदलापूर पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.
बदलापूर पालिका आणि पोलिसांकडून वारंवार आव्हान करून देखील, बदलापुरात कोरोनाचे तीन पॉझिटिव रुग्ण आढळून देखील नागरिक हे संचार बंदी गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात सर्वत्र भाजी विक्रेत्यांना परवानगी दिल्याने देखील नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर फिरताना आढळतात आहेत. त्यामुळे आता कोरोना रूग्णांची संख्या आठ वरून अकरा वर गेली असल्याने तरी बदलापुरकर या बाबत गांभीर्य दाखवणार का हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
562 total views, 1 views today