ते १२ जण बरे होऊन घरी परतले

महापालिका क्षेत्रात दिलासादायक वातावरण

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात उपचार घेत असलेल्या  कोरोनाबाधित रुग्णांपैकी १२ रूग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊन  घरी परतले आहेत ही निश्चितच ठाणेकरांसाठी दिलासा देणारी बाब आहे._
_राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह महापालिका आयुक्त विजय सिंघल, तसेच सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी,  कर्मचारी  संपूर्ण यंत्रणेसह कोरोनाबाधितांवर  उपचार करण्यासाठी  कार्यरत आहे._
_कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात औषध फवारणी, ताप बाहयरुग्ण विभाग, नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सची प्रभावी अंमलबजावणी, तज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे तपासणी, बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होवून बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे._ _एकूणच ठाण्यातील परिस्थिती समाधानकारक असून यापुढेही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मी ठाणेकरांना करीत आहे._

 500 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.