वांद्रे स्टेशनबाहेर जमलेल्या गर्दीवरून आरोप प्रत्यारोप
मुंबई : मुंबईतील वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात जमा झालेल्या मजुरांच्या गर्दीनंतर आता केंद्र विरुद्ध राज्य आणि राज्यातही महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन या गर्दीचं खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केलाय.
‘बांद्रा स्टेशनबाहेर झालेली गर्दी ही काही दिवसांपूर्वी सूरतमध्ये उद्भवलेल्या दंगलग्रस्त परिस्थितीसारखी आहे. स्थलांतरीत मजुरांना घरी परतण्यासाठी केंद्र सरकार कोणतेही पाऊल उचलत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्या मजुरांना राहायला घरे किंवा न्न नको आहे, तर त्यांना त्यांच्या घरी परत जायचे आहे. केंद्र सरकारने याबाबत काही रोड मॅप तयार केला तर स्थलांतरीत मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात त्यांच्या घरी जाणे शक्य होणार आहे. राज्यात सध्या निर्वासित छावण्यांमध्ये सुमारे सहा लाख स्थलांतरीत मजूर आहेत, त्यापैकी अनेक जण राहण्यासाठी व जेवण्यासाठीही अनुत्सुक आहेत. तर राज्यातही हीच परिस्थिती आहे. गुजरातमध्ये सूरतमध्येही स्थलांतरीत मजूर असेच संतापलेले आहेत.’ आदित्य ठाकरेंनी या सगळ्याची जबाबदारी केंद्र सरकारवर ढकललेली सतानाच, राज्यात भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर तोंडसुख घेतले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरलेले आहे. ‘बांद्र्यामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे ही अतिशय गंभीर घटना हे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण ,सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. तशी व्यवस्था होत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकारने उपाय केलेले नाहीत. आजच्या घटनेतून तरी राज्य सरकारने धडा घ्यायला हवा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी. अशआ स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करुन पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्देवी आहे. कोरोनाविरुद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभिर्यानेच लढावा लागे, ही माझी विनंती आहे ’. असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.
667 total views, 1 views today