हाफकिनकडून कोरोनावर संशोधन

सचिवस्तरावर बैठक झाल्याची वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर पाटील यांची माहिती

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या आजारावर कोणत्याही स्वरूपाचे विशिष्ट स्वरूपाचे औषध नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले आहे. तरीही या आजारावर औषध मिळविण्याठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या हाफकिन संशोधन व चाचणी संस्थेकडून काही दिवसांनंतर संशोधनाचे काम सुरु होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर पाटील यांनी दिली.

हाफकिन संस्थेकडून आतापर्यंत कुत्र्याच्या रेबिज, मलेरिया, कुष्ठरोग, एचआयव्ही-एड्स, एच१एन१ लस, कॉलरा, प्लेग आदीसह साथीच्या आजारावर आणि रोगांवर औषध संशोधन केले आहे. मात्र आता कोरोना आजारावर औषध शोधण्याची तयारी केली असून काही दिवसांपूर्वी औषधाच्या संशोधनाच्या अनुषंगाने सचिवस्तरावर बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या एक बैठक झालेली आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील नागरिकांचे प्राण वाचविण्याच्या अनुषंगाने अत्यावश्यक लागणाऱ्या पीपीई किट, मास्क, व्हेंटीलेटर आदींच्या सामग्रींना प्राथमिकता देण्यात आली आहे. मात्र साधारणत: एक महिन्याच्या कालावधीनंतर कोरोनावरील औषधाच्या अनुषंगाने संशोधनाच्या कामास सुरुवात होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने अर्थात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवश्यक असलेला निधी हाफकिनला उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या संशोधनाच्या कामास गती मिळून यावरील औषध लवकरात लवकर उपलब्ध होईल आणि हजारो नागरिकांचे प्राण वाचतील. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी हापकिनमधील अनेक संशोधक करत आहेत.

यासंदर्भात राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री अमिल देशमुख आणि हाफकिनचे व्यवस्थापकिय संचालक राजीव देशमुख यांच्याशीही सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

 675 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.