५१,००० रुपयांचा निधी केला सुपूर्त
बदलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना “प्रधानमंत्री सहायता निधी” च्या माध्यमातून सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे, ह्याच आवाहनाला प्रतिसाद देत कात्रप परिसरातील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते चेतन कमलाकर गीते यांनी आमदार किसन कथोरे यांच्या कडे ५१,००० रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.
कोरोना महामारी सध्या संपूर्ण जगात पसरला आहे. संपूर्ण देशात संचार बंदी आहे. अश्या ह्या भयानक परिस्थिती मध्ये अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर्स, नर्स, पालिका कर्मचारी हे आपल्या जिवाची पर्वा न करता देशा साठी काम करत आहेत. देशावर कुठलेही संकट आल्यावर आपण देश सेवा करायला हवी या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधान मंत्री सहायता निधी मध्ये देणगी दिली असे चेतन गीते यांनी ह्या वेळी सांगितले.
बदलापूर शहरातील युवकां साठी एक नवीन आदर्श चेतन गीते यांनी प्रस्थापित केल्याचं सांगून आमदार किसन कथोरे यांनी गीते यांचे कौतुक केलं. युवकांनी आपल्या देशाची सेवा करण्यासाठी पुढे यावं अस आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केलं आहे.
578 total views, 2 views today