शिवसेना देतेय बेरोजगारांना रोज जेवण

अडीच हजाराहून अधिक जणांना देत आहेत अन्नदान

बदलापूर : देशावर आलेले कोरोनाचे संकट निवारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने देशात संचारबंदी लागू केली असल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांना चिंता वाटू लागली आहे. संचारबंदी कधी उठेल हे माहित नाही. मात्र बदलापुरात अशा चिंताक्रांत लोकांचा वसाच जणू शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी घेतला आहे. रोज अडीच हजाराहून अधिक नागरिकांना शिजवलेले अन्न, त्यामध्ये पोष्टिक खिचडी आणि गोड पदार्थ दिले जात आहे. शिवसेनेच्या या भोजन कक्षाचे कौतुक होत आहे.
स्टेशन परिसरात पूर्व-पश्चिम भागात सकाळी दोन तास आणि रात्री दोन तास शिवसेना भोजन कक्ष सुरु केले आहे. तसेच घरा घरात महिनाभर पुरेल इतके तांदूळ , दोन प्रकारच्या डाळी, तेल, मीठ आदी वस्तू पॅॅकिंग करून प्रभागावर वाटप सुरु केले आहे. दोनशे रिक्षाचालक यांना महिनाभराच रेशनीग देण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आपण बदलापुरात या संकट समईच्या वेळी आम्ही शिवसैनिक, शासनाचे सर्व नियम पाळून अविरत काम करत आहे. जोपर्यंत देशावरील कोरोनाचं संकट जात नाही तोपर्यत बदलापुरातील शिवसैनिक कोरोनाशी लढण्यासाठी तयार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी सांगितले. रोज भोजन कक्षा बाहेर दोन -तीन किलोमीटर सूरक्षित अंतर ठेवून शिस्त पाळून प्रत्येकाची आपुलकीने चोकशी करून वामन म्हात्रे स्वत: भूकेलेल्यांच्या मुखी अन्न देत असून बदलापुरात एकही मनुष्य भुकेला राहू नये आणि उपासमार होवू नये याची काळजी घेत आहेत.

 442 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.