एमएमआरडीए प्रदेशात रुग्णांची संख्या वाढली

मुंबई महानगर प्रदेशातील मुंबईसह ११ महानगरपालिका हद्दीतील कोरोनाग्रस्तांची संख्या थेट २ हजार ८१८ वर

मुंबई : राज्यातील  कोरोनाग्रस्तांची संख्येवर नियंत्रण मिळविणे अवघड दिसत असतानाच मुंबई महानगर प्रदेशातील मुंबईसह ११ महानगरपालिका हद्दीतील कोरोनाग्रस्तांची संख्या थेट २ हजार ८१८ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबई शहरासह महानगर प्रदेशातील संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या खालोखाल पुणे महानगर प्रदेशाचा नंबर असला तरी त्याची संख्या हजाराच्या पटीत नाही. मात्र राज्याच्या संख्येतही २ हजाराच्या जवळपास पोहोचल्याचे स्पष्ट झाले. तर सोलापूर पहिला मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

आज दिवसभरात २२१ नवे कोरोनाबाधीत रूग्ण सापडले. तर २२ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला. तर २१९ रूग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. मुंबई महानगरपालिका हद्दीतील रूग्णांचा आकडा १२९८ अर्थात १३०० च्या घरात पोहोचला आहे. तर महानगर प्रदेशातील ठाणे, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका, उल्हासनगर मनपा, भिंवडी-निझामपूर मनपा, मीरा-भाईंदर मनपा, पालघर, वसई-विरार, रायगड, पनवेल मनपा आदी एमएमआर प्रदेशातील आकडा १५२०वर पोहोचला आहे. त्यामुळे या भागातील परिस्थिती चिंताजनक बनत चालल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत नांदेड, सोलापूरसह ८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त एकही रूग्ण नव्हता. मात्र आता सोलापूर जिल्ह्यात पहिला रूग्ण आढळून आला असून त्याचा मृत्यूही आजच झाल्याचे सांगण्यात आले.

 762 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.