प्रधानमंत्री सहायता निधीला सात हजार दिले
बदलापूर : येथील सेवा निवृत्त कर्मचारी तुकाराम मुंडे यांनी आपल्या पेंशन मधून ७००० रुपयांचा धनादेश प्रधानमंत्री सहायता निधी साठी आमदार किसन कथोरे यांच्या कडे सुपूर्द केला. सेवा निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या पेन्शन मधून प्रधान मंत्री सहायता निधी मध्ये मदत देणे हे फार मोठे योगदान असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
कोरोना महामारी सध्या संपूर्ण जगात पसरला आहे. संपूर्ण देशात लॉक डाऊन आहे. अश्या ह्या भयानक परिस्थिती मध्ये अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर्स, नर्स, पालिका कर्मचारी हे आपल्या जिवाची पर्वा न करता देशा साठी काम करत आहेत. अश्या परिस्तिथीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना प्रधानमंत्री सहायता निधी मध्ये सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत आयुध निर्माण कारखाना येथील सेवा निवृत्त कर्मचारी तुकाराम मुंडे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या कडे आपल्या पेंशन मधून ७००० रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.
देशावर कुठलेही संकट आल्यावर आपण देश सेवा करायला हवी या भावनेतून त्यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रधानमंत्री सहायता निधी मध्ये देणगी दिली असल्याचे तुकाराम मुंडे यांनी ह्या वेळी सांगितले.
सेवा निवृत्त कर्मचारी तुकाराम मुंडे यांनी बदलापूरतील नागरिकां समोर एक आदर्श प्रस्थापित केल्याचं सांगून आमदार किसन कथोरे यांनी मुंडे यांचे कौतुक केलं आहे. तुकाराम मुंडे यांच्या प्रमाणेच नागरिकांनी आपल्या देशाची सेवा करण्यासाठी पुढे यावं अस आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केलं आहे.
616 total views, 2 views today