मुंब्रामध्ये कोरोनाविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केली होती आडकाठी
ठाणे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होवू नयेम्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आडकाठी केल्यामुळे मुंब्रामधील दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी भादंवि कलम ३५३, १८८ अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंब्रामध्ये शादी महल रोड, अमृतनगर, येथे भाजीपाला व इतर दुकाने बंद करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गस्त घालण्यासाठी फिरत होते. यावेळी दुकाने बंद न करण्याबाबत इतर दुकानदारांना चिथावणी देणे, शासकीय कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या कारणस्तव अमृतनगर येथील दोघांवर भादंवि ३५३, १८८ अन्वये तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
780 total views, 1 views today