या अन्नछत्रातून अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यातील पाचशे भुकेल्यांना दररोज जेवणाची पाकिटे दिली जात आहेत.
बदलापूर : करोना संचारबंदीमुळे रोजचे पोट भरणे मुश्कील झालेल्या कष्टकरी, गरीब वर्गाच्या मदतीसाठी समाजभूषण साकिब गोरे अहोरात्र मेहनत घेत आहेत. याकाळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून त्यांनी अन्नछत्र सुरू केले आहे. या अन्नछत्रातून अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यातील पाचशे भुकेल्यांना दररोज जेवणाची पाकिटे दिली जात आहेत. शासनाचा समाजभूषण पुरस्कार मिळविलेले साकिब गोरे दृष्टिमित्र म्हणून ओळखले जातात. अंबरनाथ,मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील हजारो गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांची विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यांनी केली आहे. सध्या या भागातील ५०० गरजू लोकांची त्यांनी यादी तयार केली असून दररोज त्यांच्यातर्फे त्यांना जेवण पुरवले जाते.
582 total views, 2 views today