हेरीटेज बजाज करणार रिक्षाचालकांना अन्नधान्याचा पुरवठा

रिक्षाचालकांच्या घरातील चूल विझू नये, यासाठी हेरीटेज बजाजचे संचालक सुरेंद्र उपाध्याय यांचा उपक्रम

ठाणे : लॉकडाऊनमुळे सध्या रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या रिक्षाचालकांच्या घरातील चूल विझू नये, यासाठी हेरीटेज बजाजचे संचालक सुरेंद्र उपाध्याय यांनी पुढाकार घेतला असून ते रिक्षाचालकांना अन्नधान्याचा पुरवठा करणार आहेत.
देशात, राज्यात कोरोना विषाणूची महामारी जोरात फैलावत आहे. शासनाच्या आवाहना नुसार महाराष्ट्रातील कोरोना संकटाचा सामना सगळी जनता करीत आहे.राज्यात महाराष्ट्र सरकारने संचारबंदी, लॉकडाऊन सारखे चांगले निर्णय घेऊन कोरोना विषाणूचा प्रभाव, प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक योजना अमलांत आणल्या आहेत. मात्र, त्याचा फटका हातावर पोट असणार्‍या रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ही बाब ध्यानात आल्यानंतर सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले बजाज ऑटोचे अधिकृत विक्रेते तथा हेरीटेज बजाजचे संचालक सुरेंद्र उपाध्याय यांनी सर्व रिक्षाचालकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे ठरविले आहे. ज्या रिक्षाचालकांना अन्नधान्याची गरज आहे. त्यांनी मे. हेरिटेज बजाज, मिना अपार्टमेंट, पाचपाखाडी, ठाणे मोबाईल क्रमांक 9321073447 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपाध्याय यांनी केले आहे.

 587 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.