पत्नी, मुलीचा चाचणी अहवालही निगेटिव्ह
मुरबाड : गेल्या आठवड्यात करोनाची लागण झालेला मुरबाडमधील रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला असून त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांची पत्नी तसेच मुलीची चाचणी यापूर्वीच निगेटिव्ह आल्याने मुरबाडकरांचा जीव भांड्यात पडला आहे.
एक ३७ वर्षीय व्यक्ती बर्मुडा देशातून मुरबाडला आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यादरम्यान झालेल्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तातडीने त्या रुग्णाला मुंबईतील रुग्णालयात उपचारांसाठी हलवले. आता पुढील वैद्याकीय चाचणीत तो करोनामुक्त झाल्याचे आढळून आल्याने त्याला आता घरी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता मुरबाड तालुका करोना मुक्त असून नागरिकांनी सर्तकता बाळगावी. घराबाहेर पडून गर्दी करू नये, असे आवाहन तहसीलदार अमोल कदम यांनी केले आहे.
581 total views, 1 views today