कोरोना आपत्ती निमित्त मुख्यमंत्री निधीसाठी दिले आर्थिक योगदान
ठाणे : काही दिवसांपासून संपूर्ण जग, आपला अवघा भारत देश कोरोना या संसर्गजन्य रोगाशी युद्ध पातळीवर सामना करीत आहे. अश्यासमयी एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आणि त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना एक सामाजिक भान जपणारी जबाबदार सेवाभावी संस्था या नात्याने अश्या राष्ट्रीय आपत्ती समयी आपल्या राज्याच्या (महाराष्ट्राच्या) पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले परम कर्तव्य आहे. आणि याच भावनेने कोकणातील खेड तालुक्यातील, धवडे बांदरी परिसरातील एकूण आठ गावातील मोरे राव परिवारातील बंधू स्थापित कुंभाळजाई देवी सामाजिक विकास संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यत्ता निधी साठी ५०,००० रुपयांचा धनादेश आज ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला. अतिशय व्यस्त कामात ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः धनादेश स्वीकारला. त्याच बरोबर संस्थेच्या आवाहनाला ज्या ज्या दानशूर बंधूंनी, हितचिंतकांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली, त्या सर्वांची संस्था खऱ्या अर्थाने ऋणी आहे. अश्या समाजधुरणींच्या सहकार्याशिवाय ही संकल्पना प्रत्यक्षात आलीच नसती. धनादेश सुपूर्द करतेवेळी संस्थेच्या वतीने विनोद मोरे व विकास मोरे उपस्थित होते.
663 total views, 1 views today