आठ दिवसांत आजचा ३ रा भूकंपाचा धक्का
पालघर : आज पुन्हा पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यानी हादरला. सोमवारी ( ६ एप्रिल ) मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांनी जिल्ह्यातल्या डहाणू , तलासरी , बोर्डी , धुंदलवाडी भागांत भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ही ३.१ रिस्टर स्केल इतकी होती. याचा केंद्रबिंदु डहाणू जवळ भूगर्भात १० किमी खोलवर होता.
अनेकांनी यावेळी भीतीनं घराबाहेर पळ काढला. सतत च्या होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनी मुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. या अगोदर बुधवारी ( १एप्रिल ) ला रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी ३.० रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. तो पालघर जिल्ह्यातल्या डहाणू , तलासरी, बोईसर, धुंदलवाडी, बोर्डी चारोटी, कासा आदी भागांत जाणवला होता. आणि त्यानंतर शुक्रवारी ( ३ एप्रिल ) ला रात्री ११ वाजता भूकंपाचे धक्के बसले होते. या आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात हा भूकंपाचा ३ रा धक्का बसला आहे.
805 total views, 1 views today