राबोडीतील त्या दोघांचा तबलिगी संबध नाही

स्थानिक नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचा दावा

ठाणे : राबोडीमध्ये तबलिगी जमातचे सदस्य असल्याच्या संशायवरुन दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वारंटाईन राबोडीतील त्या दोघांचा तबलिगी संबध नाही आले आहे. मात्र, या दोघांचा तबलिगी जमातशी काहीही संबध नसून त्यातीूल एक तर सुन्नी जमातीचा असल्याचा दावा स्थानिक नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केला आहे.
मरकज येथे गेलेल्या दोघांना आयबीच्या अहवालावरुन दोघांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यावर नजीब मुल्ला यांनी सदर वृत्ताचे खंडण केले आहे. या दोघांना मकरजशी कोणत्याही प्रकारचा संबध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नजीब मुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, राबोडीच्या कामगार नगरमध्ये राहणारा एक भंगार व्यवसायिक आपल्या भावाच्या उपचारासाठी मुझ्झफ्फरपूरला गेला होता. तेथे जाण्यापूर्वी तो निझामुद्दीन स्टेशनला उतरला होता. तर, दुसरा एकजण मुझ्झफ्फरपूर येथे एका दर्गाहला गेला होता. या दोघांचाही मकरजशी कोणत्याही प्रकारचा संबध नाही. मात्र, हे दोघे केवळ निझ्झामुद्दीनला उतरले असल्याचा धागा पकडून अशा बातम्या पसरविल्या जात आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेऊन नये. हे दोघेही तबलिकी जमातशी संबधीत नसून ते सामान्य नागरिक आहेत, असेही मुल्ला यांनी म्हटले आहे.

 453 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.