लाॅकडाऊनमध्ये शाळा भरली ऑनलाईन

शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांतून साकारला उपक्रम

डोंबिवली :  येथील रेल चाईल्ड संस्था संचालित महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेने लाॅकडाऊन कालावधीत शिक्षक – विद्यार्थी – पालक यांची नाळ जोडून आनंददायी शिक्षणातील गोडवा टिकवण्याचा अनोखा प्रयत्न केला. मार्च महिन्यातील अखेर म्हणजे परीक्षांचा काळ आणि एप्रिल महिन्यातील कालावधीत विविध शिबिरे, खेळ गावाकडचे असो वा बालकवींच्या’चौकोनी आकाश’ पाहणाऱ्या स्मार्ट शहरातले खेळ!  एकूणच काय तर, उन्हाळ्यातली मोठ्ठी सुट्टी, कोरोना प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊनमध्ये झाली बंदिस्त….

आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगात, आनंददायी व नाविन्यपूर्ण शिक्षणातून विद्यार्थी व पालकांना सुखावण्याच्या हेतूने, रेल चाईल्ड संस्था संचालित महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक अंकुर आहेर, शाळेतील इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ शिक्षक दामोदर निनावे व राजेंद्र पाटील यांनी शाळा समिती अध्यक्ष उल्हास झोपे यांच्या सहमतीने रामनवमीच्या निमित्ताने २ एप्रिलपासून “ऑनलाईन शाळा” हा अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरविले. ऑनलाईन शाळा उपक्रमातील पहिले पाऊल अर्थात इ. ४ थी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी  २ ते १० एप्रिल  दरम्यान संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत “ENGLISH SPEAKING COURSE”  सुरू करण्याचे निश्चित केले. विद्यार्थी व पालकांच्या तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिसादातून हा उपक्रम सुरू झाला. या कोर्सच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात दामोदर निनावे यांनी माहिती देवून केली.

भयावह कोरोनाचे सावट असतानाही, महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेतील शिक्षकांनी सुरू केलेल्या  या नाविन्यपूर्ण आॅनलाईन शैक्षणिक उपक्रमाचे, रेल चाईल्ड संस्था अध्यक्ष  दत्तात्रय गोडबोले, कार्यवाह भगवान सुरवाडे तसेच पदाधिकारी तसेच शाळा समिती अध्यक्ष  उल्हास झोपे, सदस्य मुरलीधर चौधरी व सुमेधा साठ्ये तसेच रेल चाईल्ड प्राथमिक शाळेच्या शाळा समिती अध्यक्षा शोभा अंबरकर यांनी कौतुक केले.

हा उपक्रम, लाॅकडाऊन परिस्थितीत पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी रेल चाईल्ड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या जैन व सर्व शिक्षकवृंद तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लवकरच शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ च्या अनुषंगाने इ. ५ वी ते १० वी चे हसत खेळत अभ्यासवर्ग, छंदवर्ग सुरू होणार आहेत, असे महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक अंकुर आहेर यांनी जाहीर केले.

 747 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.