ठाण्यात डॉक्टरालाच झाली कोरोनाची बाधा

कळव्यात आणखी एक बाधित सापडला

ठाणे : मागील दोन दिवसात ठाण्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नव्हता, त्यामुळे ठाणोकरांना थोडासा दिलासा देणारी बातमी होती. परंतु आता ठाण्यात एक डॉक्टर आणि कळव्यात आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे. बाधित डॉक्टरला उपचारार्थ ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर डॉक्टरच्या दवाखान्यात मागील तीन ते चार दिवसात कीती रुग्ण येऊन गेले याची माहिती आता पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत काढली जात आहे. तसेच त्याची पत्नी आणि मुलाला आता होम क्वॉरान्टाइन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या डॉक्टराची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला ही बाधा झाली असावी अशी शक्यताही वर्तविली जात असून त्यानुसार तो रुग्ण कोण, तो कुठे आहे, याचा शोध सुरु झाला असून त्यामुळे ठाणोकरांच्या चितेंत भर पडली आहे.
ठाण्यातील कोरोनाची परिस्थिती सध्या इतर शहरांच्या तुलनेत बरी होती. परंतु आता ठाण्यासाठी चिंतेची गोष्ट निर्माण झाली आहे. ठाण्यात आतार्पयत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही १२ एवढी होती. त्यात गुरुवारी सकाळी आणखी दोघा रुग्णाची भर पडली आहे. काजुवाडी भागात दवाखाना चालवित असलेल्या एका डॉक्टरालाच कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या डॉक्टर रुग्णाला कस्तुरबा येथे हलविण्याच्या हालचाली बुधवारी रात्री सुरु होत्या. नंतर त्याला मोठय़ा खाजगी रुग्णालयात जाण्यासही सांगण्यात आले होते. परंतु तेथे बेड उपलब्ध नसल्याने अखेर गुरुवारी सकाळी त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या डॉक्टरची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने त्याला याची लागण कशी झाली याचा शोध आता पालिकेच्या माध्यमातून सुरु झाला आहे. या डॉक्टरचा दवाखाना हा काजुवाडीत असून, मागील चार ते पाच दिवसात त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची शोध मोहीम पालिकेने सुरु केली आहे. यासाठी या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदतही घेतली जात असल्याची माहिती डॉ. आर. टी केंद्रे यांनी दिली. या डॉक्टरला ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने एखादा कोरोना बाधीत रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी आला होता का? याचाही माहिती घेण्याचे काम आता सुरु झाले आहे. तसे असेल तर तो रुग्ण सध्या कुठे आहे, याचाही तपास आता केला जात आहे. दुसरीकडे संबधीत डॉक्टरची पत्नी आणि मुलालाही मानपाडा येथील त्यांच्या घरातच होम क्वॉरान्टाईन करण्यात आल्याचेही केंद्रे यांनी सांगितले. तसेच त्यांचीही तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 615 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.