कोरोना बाधीतांच्या संपर्कात येणाऱ्यांची योग्य वेळेत तपासणी करा

महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला आदेश

ठाणे  : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. परंतु कोरोनाला आपल्याला हरवायचे असले तर कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात येत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना होम क्वॉरान्टाईन किवा पालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवावे व त्यांची वेळीच योग्य तपासणी करुन पुढील धोका टाळावा असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले आहेत.

गुरुवारी दुपारी त्यांनी लोकशाही आघाडीचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या समवेत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाला हरवायचे असेल तर आपल्याला विविध उपाय योजना करणो आणि काही वेळेस कठोर निर्णय देखील घ्यावे लागणार असल्याचे सांगितले. सध्या महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत जात आहे. आता तर रुग्णावर उपचार करणा:या डॉक्टरालासुध्दा कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे असे जर रुग्ण आढळत असतील तर त्यांच्या संपर्कात येणा:या प्रत्येकाचा शोध घेऊन वेळीच त्यावर योग्य ती खबरदारी घेणो गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार अशा संपर्कात येणाऱ्याचा शोध घेऊन त्यांना वेळीच क्वॉरान्टाइन करावे जेणो करुन भविष्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाला आपल्याला रोखण्यास मदत होईल. त्यानुसार याची काळजी घेऊन पालिकेने त्यांच्या टीम तयार करुन तशी पाहणी करुन, त्या संशयीतांचे तपासणी अहवालही तत्काळ कसे उपलब्ध होतील यासाठी देखील पावले उचलणो गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी काम करणाऱ्या टीमचेही यावेळी महापौरांनी त्यांचे कौतुक केले. तसेच प्रत्येक अधिकाऱ्यावर कामाची जबाबदारी फिक्स करावी जेणो करुन मुंबईत ज्या पध्दतीने कोरोना वाढत आहे, तसा फैलाव ठाण्यात होऊ नये यासाठी ही जबाबदारी देण्यात यावी. शिवाय मुंबईतून अथवा देशाच्या इतर भागात असलेल्या कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात ठाण्यातला जर कोणी आला असेल तर त्याचाही आता शोध घेऊन त्यांचीही तपासणी केली जावी व त्या संबंधी काळजी घ्यावी अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

 578 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.