रक्तदान शिबिर यशस्वी

७६ बाटल्या रक्त जमा

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ७६ बाटल्या रक्त जमा करण्यात आले आहे. १६ रक्तदात्यांना इच्छा असूनही रक्त देता आले नाही. वैद्यकीय कारणामुळे त्यांना परत फिरावे लागले. या १६ मध्ये १५ महिला रक्तदात्या होत्या. येत्या बुधवार १ एप्रिल रोजी पुन्हा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या महामारीला सर्व पातळीवर तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असताना त्यांना सामाजिक शैक्षणिक संघटनाही सक्रिय सहकार्य करीत आहेत. या महामारीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत आहे. रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासणार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अंबरनाथ नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २९ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी तीन या वेळेत आणि बुधवार १ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी दोन यावेळेत रोटरी सभागृह, वडवली विभाग, अंबरनाथ पूर्व येथे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सुरक्षेचा उपाय म्हणून रक्तदान करणार्यांनी प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. आयत्यावेळी येणार्यांना रक्तदान करता येणार नाही. रक्तदात्यांना रक्तदान केंद्रावर ठरवून दिलेल्या वेळी घरून घेऊन येणे आणि रक्तदान झाल्यावर पुन्हा घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आज सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराला प्रारंभ करण्यात आला. या शिबिराला डोंबिवली येथील प्लाझ्मा रक्तपेढीचे सहकार्य लाभले होते. दुपारी ३ पर्यंत ची वेळ देण्यात आली होती. मात्र प्रतिसाद चांगला मिळाल्याने साडेचार वाजेपर्यंत शिबिर सुरू होते. एकूण ७६ बाटल्या रक्त जमा करण्यात आले. १६ रक्तदात्याना इच्छा असूनही रक्त देता आले नाही. यात १६ पैकी १५ महिला रक्तदात्या होत्या. ज्यांना इच्छा असूनही रक्त देता आले नाही.
येत्या बुधवार १ एप्रिल रोजी सकाळी ११ ते ३यावेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी सुद्धा पूर्व नोंदणी आवश्यक असल्याचे रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष दीपक रेवणकर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी रो. डॉ. सागर धडस 8928777700 आणि रो. मुकेश विसपुते 9867655009 यांचेशी संपर्क साधावा.
सध्याची आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक रेवणकर यांनी केले आहे.

 394 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.