जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढतोय

ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा १८ वर

ठाणे : दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. त्यात जिल्ह्यात बुधवारी तीन नवीन रुग्ण सापडले असतांना, गुरुवारी अणखी चार नवीन रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर, दुसरीकडे कोरोना आजारातून बरे होत असल्याने दिलासा देखिल मिळत आहे. त्यात ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत देखिल दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे. जिल्ह्यातील सहा महानगरपालिकांसह नगरपरिषद, जिल्हा शासकीय रुग्णालयासह विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षांची उभारणी करण्यात आली. ठाणे महापालिकाक्षेत्रात बुधवारी ठाण्यातील कळवा भागातील तर, कल्याण ग्रामीण आणि नवी मुंबईतील वाशी येथे प्रत्येकी एक असे तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. तर, गुरुवारी ठाणे पालिकाक्षेत्रातील लुईवाडी येथे एक, नवी मुंबई येथे दोन आणि कल्याण येथे एक असे ४ नवीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे ठाण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३ झाली. कल्याणमध्ये सहा तर, नवीमुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आला आहे. तसेच उल्हासनगरात एकाच व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ झाल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे.

पालिका क्षेत्र कोरोना बाधीत संख्या
ठाणे महापालिका ३
कल्याण-डोंबिवली पालिका ६
कल्याण ग्रामीण १
नवी मुंबई महापालिका ७
उल्हासनगर पालिका १
एकूण १८

 576 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.