आजाराला सामोरे जाण्याची शक्यता
ठाणे : कोपरी परिसरातील महर्षी वाल्मिकी मार्ग येथील नाल्यात कचरा अडकल्याने आजूबाजूच्या रहिवाश्यांना दुर्गंधी ला सामोरे जावे लागत आहे .परिसरातील श्रमदान सोसायटी , प्रज्ञा सोसायटी , नवकल्पतरू सोसायटी च्या मधल्या आवारात नाल्यामध्ये प्रवाहात कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे म्हणून स्थानिकांनी समाजसेवक हेमंत पमनानी आणि रोहित गायकवाड यांनी नाल्याची पाहणी केली.नाल्यात कचऱ्याचा प्रवाह रोखण्यासाठी झाळी लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर हेमंत पमनानी यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन करून लवकरात लवकर नाल्यातील कचरा साफ करण्याचे आदेश दिले.येत्या आठवड्यात नाला साफ करून देण्याचे आश्वासन हेमंत पमनानी यांनी स्थानिकांना ह्या वेळी दिले आहे.
727 total views, 1 views today