पुण्यातील आणखी ३ कोरोनामुक्त रूग्णांना उद्या मिळणार डिस्चार्ज

करोनाच्या बाबतीत आणखी एक सुखद बातमी

पुणे : शहरात सर्वप्रथम आढळलेल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला बरे झाल्यानंतर आज नायडू रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. त्या पाठोपाठ आणखी तीन रुग्णांची कोरोना चाचणी दुसऱ्यांदा निगेटीव्ह आल्याने तिघांनाही उद्या (गुरुवारी) डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

राज्यात सर्वात पहिला कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात सापडला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९ पर्यंत वाढली. मात्र आता उपचारांनंतर या रुग्णांनी कोरोनावर मात करण्यास सुरूवात केली आहे. १४ दिवसानंतर केलेल्या चाचणीत आतापर्यंत पाच रुग्ण कोरोना निगेटीव्ह झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुण्यातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटून १४ झाली आहे.कोरानामुक्त झालेल्या दाम्पत्याला नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्या पाठोपाठ आणखी तीन रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतणार आहेत, ही खूप मोठी दिलासादायक घटना असणार आहे. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये उपचारांनंतर चांगली सुधारणा दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांत पिंपरी-चिंचवड एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

 581 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.