कोरोनाविरोधातील लढाई जिंकली

महाराष्ट्राचं पहिलं कोरोनाबाधित दाम्पत्य उपचारानंतर ठणठणीत

पुणे : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी (Pune Corona Patient) महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रात कोरोनाची सर्वात अगोदर लागण झालेल्या दाम्पत्याची प्रकृती ठणठणीत झाली आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे (Pune Corona Patient). याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात ९ मार्च रोजी पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. हे दोघी रुग्ण पती-पत्नी होते. ते वीणा ट्रॅव्हल्समार्फत १ मार्चला दुबईवरुन आले होते. त्यांना ६ मार्चपर्यंत कोणतेही लक्षणं दिसली नाहीत. मात्र, ९ मार्च रोजी पत्नीला कोरोनाची लक्षणं जाणवायला लागले. म्हणून त्यांनी तपासणी केली. दोघांचीही रक्त तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटीव्ह निघाले. यानंतर तातडीने त्यांना पुण्याच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करुन उपचार सुरु केले होते. या दाम्पत्यावर १३ ते १४ दिवस उपचार केल्यानंतर आज अखेर या रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याचं समोर आलं आहे. या दोघी रुग्णांच्या रक्त तपासणीत कोरोना निगेटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या दाम्प्त्याच्या संपर्कात आल्याने त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. या मुलीवरही नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिचीदेखील प्रकृती स्थिर आहे. मात्र, अद्याप तिच्या रक्त तपासणीचं रिपोर्ट आलेलं नाही.

 700 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.