महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला


मुंबईत तिसरा बळी तर २४ तासात १५ रुग्ण वाढले आहेत

 मुंबई : कोरोना व्हायरसचं थैमान जगभरात सुरू आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात २४ तासात तब्बल १५ रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. मुंबईतील खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती ६८ वर्षीय असून फिलिपिन्स येथून आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण तीन जणांचे बळी घेतले आहेत.

मुंबईत १४ , तर पुण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७४ वरुन ८९ वर पोहोचला आहे. कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या कालच्या दिवसातील १५ रुग्णांपैकी चार जणांनी कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांचा प्रवास केलेला आहे. तर उर्वरित आठ जण हे आधीच कोरोना झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी ही चिंतेची बाब आहे.

पुण्यात परदेशी प्रवास न केलेल्या किंवा त्यांच्याशी थेट संपर्क न आलेल्या ४१ वर्षे महिलेला व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या महिलेच्या संपर्कातील सहापैकी चार जणांना बाधा झाल्याचे अहवालात स्पष्ट म्हटलं आहे. चार व्यक्तींमध्ये महिलेच्या मुलाचाही समावेश आहे. त्याचबरोबर तिची बहीण, बहिणीचा पती आणि मुलीला बाधा झाली आहे. या सर्वांवर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पाचही जणांची परदेश प्रवास किंवा संबंधित प्रवाशांच्या संपर्काची कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईत तिसरा बळी 

६८ वर्षीय  फिलिपिन्स नागरिकाला १३ मार्चला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचे संसर्ग आढळून आल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, त्याच्या प्रकृतीत सुधार झाला होता. कस्तुरबामध्ये उपचार घेतल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं.  या रुग्णाला मधुमेह आणि अस्थमाचा त्रासही होता. अखेर रविवारी रात्री या रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूचा आकडा मुंबईत ३वर पोहोचला आहे.

भारतात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३९६ वर पोहोचली आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत देशभरात ८० हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. 

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

मुंबई – ३९
पुणे – १६
पिंपरी चिंचवड – १२
नागपूर – ४
यवतमाळ – ४
कल्याण – ४
नवी मुंबई – ३
अहमदनगर – २
पनवेल – १
ठाणे -१
औरंगाबाद – १
रत्नागिरी – १
उल्हासनगर – १

एकूण ८९

 439 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.