महापालिका आयुक्तांचा निर्णय – मोठ्या प्रमाणात यंत्रणा कार्यरत
ठाणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व सार्जनिक ठिकाणे, बस डेपो, रेल्वे स्टेशन्स आणि मार्केटस निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा प्रभाग स्तरावर तीन शीप्टमध्ये कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत.
कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रामध्ये फुटपाथ, विविध मार्केटस, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, भाजी मार्केट, फिश मार्केट, गर्दीची ठिकाणे आणि सर्वच सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभाग स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असून १० ट्रॅक्टर्स, ८० स्प्रेईंग मशीन्स,अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि जवळपास १४० कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आली आहेत.
808 total views, 2 views today