कामगारांना जीवनाश्यक वस्तू पुरवण्याचे शिवसैनिकांना आवाहन
नवी मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर कठोर उपायांची अंमलबजावणी केली जात आहे. या निर्णयामुळे हातावर पोट असणाऱ्या वर्गाला या निर्णयांचा फटका मोठा फटका बसणार आहे.
त्याची दखल घेऊन नवी मुंबईतील शिवसेनेने या वर्गाला मदतीचा हात दिला असून त्यांना जीवनाश्यक वस्तू पुरवण्याचा निर्णय घेतला आहे
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अवघ्या जगभर हाहाकार उडाला आहे. या आजारावर ठोस उपचार पद्धती किंवा प्रतिबंधात्मक लस सध्यातरी उपलब्ध नसल्यामुळे त्याचा प्रसार रोखणे हेच आपल्या सर्वांच्या हातात आहे. त्यासाठी राज्य सरकारने तसेच विविध जिल्हा प्रशासनाने आपापल्या अखत्यारीतील शहरांमध्ये दुकाने, बाजार,आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याचा मोठा विपरीत परिणाम अनेकांचा रोजगार बुडण्यात झाला आहे.बांधकाम कामगार, हमाल, मजूर, छोटे फेरीवाले, विक्रेते, घर कामगार यांच्या उदरनिर्वाहावर गदा आली आहे त्यामुळे ह्या वर्गाची उपासमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हातावरचे पोट असलेल्या या गरीब वर्गाला सध्या सर्वाधिक मदतीची गरज आहे. करोना मूळे झालेली बंदी आणखी काही दिवस कायम राहणार आहे.अशा परिस्थितीत या वर्गाच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याची मोठी जबाबदारी आहे . त्यामुळेपरिसरातील असे नागरिक, कुटुंबे यांच्यापर्यंत धान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू पुरवणे किंवा त्यांच्या रोजच्या जेवणाची जबाबदारी घेणे अशा उपायांच्या माध्यमातून या वर्गाला आधार देण्याची सूचना शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी केली आहे. यासंदर्भात शिवसैनिकांना काही अडचण आल्यास ९६१९३४६३६२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन नाहटा यांनी केले आहे.
733 total views, 1 views today