जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद

आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा

डोंबिवली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांनी महापालिका क्षेत्रातील जीवनावश्यक दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेशीत केले आहे. आजपासून २० तारखेपासून ३१ मार्च पर्यत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी संघटना, ज्वेलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
कोरोनाचा फैलाव अधिक वाढण्याची शक्यता गृहीत धरून हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानूसार उद्या सकाळपासून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीतील जीवनावश्यक वस्तू, बेकरी, डेअरी, किराणा दुकाने, मेडीकल स्टोअर्स, रुग्णालय/क्लिनिक, भाजीपाला आदी दुकाने आणि आस्थापना वगळता इतर सर्व दुकाने , व्यावसायिक आस्थापना ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.असे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राऊत यांनी या बैठकीत सांगितले. याला प्रतिसाद देत व्यापारी संघटना, ज्वेलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बंद ठेवण्यास पाठिंबा असल्याचे सांगितले. दरम्यान महापालिका क्षेञातील रिक्षा चालकांनी देखील खबरदारीचा उपाय म्‍हणून रूमालाचा किंवा मास्‍कचा वापर करावा आणि शक्‍यतोवर सॅनिटायझर जवळ बाळगावेत, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्‍यात आले आहे.

 627 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.