येस बँकेचा शेअर वधारला

मूडीजने सकारात्मक दर्जा दिल्याचा मिळाला फायदा

मुंबई : मागील आठवड्यात आपल्या खातेधारकांच्या तोंडाचे पाणी पळवणाऱ्या येस बँकेला आजचा मंगळवार फायदेशीर ठरला आहे. सोमवारी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी येस बँकेच्या ठेवीदारांनी खात्यांमधून पैसे काढण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन केले होते. त्यात मूडीज या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने येस बँकेचा पतदर्जा हा ‘सकारात्मक’ केल्याचा फायदा बँकेला मिळाला. बाजार मागे बंद झाला तेव्हा येस बँकेचा शेअर २३ रुपये ५५ पैसे किमतीचा होता. पण आज सकाळी बाजार उघडला तेव्हा येस बँकेच्या शेअरने ६० रुपये ६५ पैसे एवढी किंमत मिळवली होती.
आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेवरील तात्पुरते निर्बंध १८ मार्चपासून शिथिल करण्यात येणार आहेत. सात खाजगी बँकांनी येस बँकेत भांडवली गुंतवणूक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने येस बँकेचा ४९ टक्के हिस्सा घेतला आहे. यासाठी स्टेट बँकेने येस बँकेचे ६ हजार ५० कोटी रुपयांचे ६०५ कोटी शेअर खरेदी केले आहेत. तसेच येस बँकेला गरज भासली तर आणखी भांडवली सहाय्य करण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरांनी शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले होते . ठेवीदारांनी चिंता करण्याची गरज नाही, त्यांचा पैसा बँकेत सुरक्षित असल्याची ग्वाहीदेखील दास यांनी दिली. त्यामुळेहि बँकेचा शेअर वधारला असल्याचे बोलले जात आहे.

 462 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.