संजीवराजे नाईक–निंबाळकर खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

सचिन गोडबोले- कार्याध्यक्ष, गोविंद शर्मा- सरचिटणीस,ॲड. अरुण देशमुख-खजिनदार

पुणे : महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेची स्पोर्ट्स कोड प्रमाणे २०२० ते २०२४ या कालावधी करता निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत विविध पदांकरिता करिता कोणाचाही जादा अर्ज न आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. फडके सभागृह, सदाशिव पेठ, पुणे येथे पार पाडलेल्या निवडणुकीत सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत असे निवडणूक अधिकारी निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप कृष्णा गायकवाड यांनी जाहीर केले. संघटनेच्या अध्यक्षपदी संजीव नाईक निंबाळकर यांची निवड झाली. या निवडणुकीसाठी भारतीय खो खो महासंघाचे निरीक्षक म्हणून इंदोरचे नितिन कोठारी उपस्थित होते. निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले,

अध्यक्ष : संजीवराजे नाईक – निंबाळकर (सातारा).

उपाध्यक्ष (४ जागा): डॉ. जितेंद्र आव्हाड (ठाणे), महेश गादेकर (सोलापूर),अशोक पितळे (अहमदनगर), विजयराव मोरे (रायगड)

कार्याध्यक्ष : सचिन गोडबोले (पुणे)

सरचिटणीस :गोविंद शर्मा (औरंगाबाद)

संयुक्त चिटणीस (५ जागा) : राजेश सोनवणे (नंदुरबार), डॉ. पवन पाटील (परभणी), जयांशू पोळ (जळगाव), डॉ. प्रशांत इनामदार (सांगली), गंधाली पालांडे (ठाणे)

खजिनदार : ॲड. अरुण देशमुख (मुंबई)

 689 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.