शहरातील डान्स बार,बार रेस्टोरंन्ट,लॉजिंग बोर्डिंग बंद करा

राजे प्रतिष्ठानची नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी

नवी मुंबई : कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा, कॉलेज, तरण तलाव, मॉल, जिम बंद करण्याचे आदेश दिले असून जमावबंदीची ही घोषणा केली आहे.असे असतांनाही नवी मुंबई व पनवेल शहरातील डान्स बार,बार रेस्टोरंन्ट,लॉजिंग बोर्डिंग हे गर्दी होण्याची ठिकाणे राजरोसपणे सुरु आहेत.त्याच्यावर तत्काळ कारवाई करून तें सर्व ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात यावेत अशी मागणी राजे प्रतिष्ठान नवी मुंबई सचिव योगेश महाजन यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
नवी मुंबई व पनवेल शहरातील डान्स बार,बार रेस्टोरंन्ट,लॉजिंग बोर्डिंग हे परराज्यातील तसेच विविध शहरातील नागरिकांसाठी माहेर घर असल्याने या ठिकाणी परराज्यातील तसेच विविध शहरातील नागरिकांचा रात्री उशिरा पर्यंत गोंधळ सुरु असतो.सीबीडी व पनवेल हायवे मार्गांवर डान्स बार व बार रेस्टॉरंटची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.पुण्यासह विविध शहरात कोरोनाने दहशत माजवली असल्याने डान्स बार,बार रेस्टोरंन्ट,लॉजिंग बोर्डिंग या ठिकाणाहून त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो त्यामुळे तत्काळ यावर बंदी आणावी अशी मागणी योगेश महाजन यांनी केली आहे.

 776 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.