रंगपंचमी निमित्त उपवन तळ्याकाठी स्वत्व तर्फे कलात्मक होळी साठी चेहेरे रंगवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे : ठाण्यातील उपवन तलाव शेजारी स्वत्व तर्फे चेहरे रंगवा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी 8 वाजल्या पासून या कर्यक्रमास सुरवात झाली स्वत्व च्या बरोबर असणाऱ्या कलाकारांनी आपल्याच सहकार्याचे चेहरे रंगवण्यास सुरवात केली व काही वेळाने उपवन परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांनी सुद्धा स्वत्वच्या कलाकारांकडून चेहरे रंगवून घेण्यास सुरुवात केली.
अनेक जण येऊन आमच्याकडून चेहेरे रंगवून घेत होते बराच वेळ एक खाकी वर्दीतील इसम हे सर्व दुरून पहात होता. थोड्यावेळाने जवळ येऊन उत्सुकतेने पाहू लागला. आणि मग त्याने मला हलकेच विचारले माझा चेहेरा रंगवणार का? मी लगेच त्याला समोर बसविले. बोलता केला. शास्त्रीनगर परिसरातील घंटागाडीवरील चालक. होळीच्या दिवशी ही यांना सुट्टी नसते. मग मस्त पैकी पट्टेरी वाघाचा भास होणारे चित्र त्याच्या चेहेऱ्यावर रंगवले. यांच्या सारखे वाघ आपल्या शहरात असतात म्हणून तर आपली शहरे सुरळीत चालतात मग तो खाकीतील आज भेटलेला घंटागाडी घेऊन कचरा गोळा करणारा दादा असो की विजेच्या तारांवर चढून दुरुस्ती करीत आपला पुरवठा सुरू ठेवणारा लाईन्समन किंवा आपल्या पत्रांचा बटवडा करणारा पोस्टमन आपल्या बसचे चालक वाहक, रिक्षावाले, पोलीस कितीतरी खाकीतील वाघ आपण रोज पहातो.

त्यांना सणांच्या सुट्ट्या नसतातच. आज एकाच्या आयुष्यात आनंदाचे दोन क्षण आणि चेहेऱ्यावर हास्य आणू शकलो यातच मला आनंद झाला असल्याचे श्रीपाद भालेराव यांनी सांगितले स्वत्व तर्फे रंगपंचमीच्या दिवशी अश्या छान उपक्रम राबवून त्यांनी ठाणेकरांची रंगपंचमी चा आनंद वाढवला असून इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी नागरिकांचे चेहरे रंगवले आहेत आज खऱ्या अर्थाने रंगपंचमी साजरी झालेचे व इथून पुढे दरवर्षी स्वत्व तर्फे असाच उपक्रम राबविण्यात यावा असे स्थानिक नागरिक संतोष साटम यांनी सांगितले

 4,055 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.