तुर्भे येथे शिवसेनेला भगदाड

नगरसेवक राजेश शिंदे यांचा राजीनामा

लवकरच करणार भाजपात प्रवेश

सेनेचे आणखी चार ते पाच नगरसेवक लवकरच पक्ष सोडणार

नवी मुंबई : भाजपातील आयाराम नगरसेवकांना पक्षप्रवेश देणाऱ्या नवी मुंबई शिवसेनेमधील निष्ठावंत शिवसैनिकामध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी उफाळून आली असून तुर्भे येथील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक राजेश शिंदे यांनी शिवसेना नेत्यांच्या मनमानी कारभाराला आणि अन्यायाला कंटाळून अखेर शुक्रवारी महापालिका आयुक्तांकडे आणि पालिका सचिवाकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजेश शिंदे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. राजीनामा देतेप्रसंगी त्यांच्या सोबत भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा जेष्ठ नगरसेवक रामचंद्र घरत, शिवसेनेचे उप विभाग प्रमुख संजय गुप्ता , शाखा प्रमुख किशोर राठोड शाखा प्रमुख संजय गोपाळे शाखा प्रमुख सचिन वाघमारे शाखा प्रमुख राजू जवरे उपस्थित होते. तुर्भे येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी या तीन समर्थक नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. कुलकर्णी हे गणेश नाईक यांच्या अत्यंत जवळचे सहकारी होते. गणेश नाईक यांनी त्यांना तीन वेळा स्थायी समितीच्या सभापती पदावर काम करण्याची संधी दिली मात्र तरीही त्याना तुर्भे भागाचा विकास साधता आला नाही. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने तुर्भे येथे शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. नगरसेवक राजेश शिंदे हे तुर्भेमध्ये शिवसेनेचा चेहरा समजले जातात. या विभागामध्ये शिवसेना वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेकडून लढताना अवघ्या ११२ मतांनी ते पराभूत झाले होते. तर सेनेची दुसरी जागा केवळ २०० मतांनी हातची गेली होती. भाजपातून आलेल्या संधीसाधू नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडून रेड कार्पेट टाकले जात असल्याने तुर्भे विभागातील चारही प्रभागात शिवसैनिक कमालीचे संतापले आहेत. वर्षानुवर्ष शिवसेनेसाठी इमानेइतबारे काम करणाऱ्या शिवसैनिकांची कुचंबना झाली आहे. सुरेश कुलकर्णी यांच्या शिवसेना प्रवेशानंतर शिवसेनेला मोठी गळती सुरू झाली आहे. आपल्या राजीनाम्या बद्दल प्रतिक्रिया देताना नगरसेवक राजेश शिंदे म्हणाले कि, ज्या तुर्भे स्टोर येथे निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होत होती त्या प्रभागात आम्ही काटे कि टक्कर दिली. तुर्भे स्टोर भागात शिवसेनेला घरोघरी पोहचवले. आता कुठे चांगले दिवस आले असताना शिवसेनेत संधीसाधुना घेतले जाते आहे. तीन वेळा स्थायी समितीचे सभापतीपद मिळूनही ज्या नगरसेवकाला तुर्भेचा विकास करता आला नाही त्या निष्क्रिय नगरसेवकाला शिवसेनानेते पायघड्या घालत असून निष्ठावान शिवसैनिकावर अन्याय करीत आहेत. तुर्भे स्टोर भागातील ८० टक्के शिवसैनिक सेनेतील या मेगा भरतीमुळे नाराज आहेत. ते भाजपात प्रवेश करणार आहेत. लोकनेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईचा आजवर झालेला विकास आम्ही पाहिला आहे. त्यामुळेच आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्भेत आम्ही सर्वांनी परिवर्तन घडविण्याचा निर्धार केला आहे.

जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी नगरसेवक राजेश शिंदे यांच्यापासून शिव सेनेच्या नगरसेवकांचा भाजपात प्रवेश करण्याचा शुभारंभ झाला असून आणखी चार ते पाच सेनेचे नगरसेवक प्रवेश करणार आहेत अशी माहिती दिली. राजेश शिंदेसारख्या ज्या नगरसेवकांनी जनतेची कामे केली आहेत. त्यांनाच आम्ही भाजपात प्रवेश देणार आहोत. तुर्भेतील सर्व जागा भाजपा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या मेगा भरतीमुळे नवी मुंबईतील विविध भागातून सेनेचे नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत आहेत शिवसेनेच्या जिल्हा उप-संघटिका ऍडवोकेट संध्या सावंत, विभाग प्रमुख कैलास सुकाळे यांच्यासह दिवा कोळीवाड्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपाचे कमळ अलीकडेच हाती घेतले आहे. येत्या काही दिवसात शिवसेनेकडून भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू होईल अशी चर्चा आहे. महापालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीचे घोड अडल असतानाच आता शिवसेनेमधील रथी-महारथी पक्षाला रामराम ठोकून हाती कमळ घेत असल्याने शिवसेना नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

 682 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.