अमर हिंद, शिवनेरी, विद्यार्थी, सह्याद्री, श्री समर्थ दुसऱ्या फेरीत

अमरहिंद मंडळ आयोजित पुरुष महिला निमंत्रित जोडजिल्हा खो खो स्पर्धा

मुंबई : दादरच्या अमरहिंद मंडळ आयोजित पुरुष आणि महिला गटाच्या निमंत्रिताच्या मुंबई , मुंबई उपनगर मर्यादित खो खो स्पर्धेत अमर हिंद, शिवनेरी, विद्यार्थी, सह्याद्री व श्री समर्थ या संघांनी आपआपले सामने जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला. हि स्पर्धा ५ ते ८ मार्च या कलावधीत अमरहिंद मंडळाच्या क्रीडांगणावर रंगणार आहे.
पुरुषांच्या सामन्यात मुंबईच्या विद्यार्थी क्रीडा केंद्राने उपनगरच्या युवा स्पोर्ट्स क्लबचा १४ -१३ असा तब्बल साडे सहा मिनिटे राखून एक गुणाने पराभव केला. या सामन्यात विद्यार्थीच्या सागर मालपने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले, प्रेम रसाळने दोन मिनिटे वीस सेकंद संरक्षण केले तर राहुल उईकेने एक मिनीट पन्नास सेकंद संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले व आयुष गुरवने एक मिनीट दहा सेकंद संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले. ओमकार मिरगळने चार खेळाडू तंबूत धाडून सामन्यावर पकड मिळवली. तर पराभूत युवा स्पोर्टसच्या रोहन नारकरने एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण केले शशांक घागने एक मिनिट वीस सेकंद व एक मिनिट पाच सेकंद संरक्षण केले तर किरण जाधव, प्रथमेश खोत व अनिकेत शिंदेने प्रत्येकी तीन-तीन खेळाडू बाद केले.
पुरुषांच्या अन्य सामन्यात यजमान अमरहिंद मंडळाने विजय क्लबचा १४ – १२ असा सात मिनिटे राखून दोन गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात अमरहिंदच्या निरव पाटीलने दोन मिनिटे वीस सेकंद व दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला. प्रसाद राडीयेने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले अभिषेक कागडाने दोन मिनिटे संरक्षण केले व सिद्धेश चोरगेने तीन खेळाडू बाद केले. तर पराभूत विजय क्लबच्या विशाल गायकवाड, प्रणय प्रधान अभिषेक पार्टे व आदेश पाडावे यांनी चांगला खेळ केला.
महिला गटाच्या सामन्यात यजमान अमर हिंद मंडळाने विलेपार्लेच्या जिजामाता स्पोर्ट्स क्लबचा ०९ -०३ असा एक डाव सहा गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात अमरहिंदच्या रुद्रा नाटकरने तीन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले. संजना कुडवने नाबाद तीन मिनिटे तीस सेकंद सौरक्षण करून चार खेळाडू बाद केले तर देवीशा म्हात्रेने दोन मिनिटे संरक्षण केले. पराभूत जिजामाता स्पोर्ट्स क्लबच्या नम्रता पांडेने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण केले तर प्रियंका पाटीलने एक मिनिट पन्नास सेकंद संरक्षण करून जोरदार लढा देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना इतरांची साथ न मिळाल्याने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
महिलांच्या दुसऱ्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबचा ९ -५ असा एक डाव चार गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात शिवनेरीच्या सायली म्हैसधुणेने तीन म्हणजे दहा सेकंद संरक्षण केले व दोन खेळाडू बाद केले, शिवानी गुप्ताने मोलाची साथ देताना दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करत पाच खेळाडू बाद केले. पराभुत वैभवच्या अंतरा वायंगणकर व शिवांगी सिंग यांनी चांगला खेळ केला.
इतर सामन्यात श्री सह्याद्री संघ, मुंबई उपनगर ने युवक क्रीडा मंडळ मुंबई चा १४ – ९ असा एक डाव पाच गुणांनी धुव्वा उडवला तर श्री समर्थ व्यायाम मंदिरने यु. बी. स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगरचा १४ – १२ असा एक डाव दोन गुणांनी धुव्वा उडवला

 506 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.