ठाणे झेडपीच्या आरोग्य विभागातील महत्वाची पदांसह १३३ पदे रिक्त


रिक्त पदे भरण्याची झेडपी अध्यक्षा दिपाली पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी


ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरीकांच्या आरोग्याची मदार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य विभागावर असते. मात्र, याच आरोग्य विभागतील अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकार्‍यासह माता बाल संगोपन अधिकारी पदासह अन्य महत्वाची १३३ पदे रिक्त असल्यामुळे जिल्ह्याचे स्वस्थ बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याची गांभीर्याने दखल ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा दिपाली पाटील यांनी रिक्त पदे भरण्याबाबात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी निवेदनाद्वारे केली.
नुकतेच विधान भवनात ठाणे जिल्ह्यातील समस्यांच्या आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. यावेळी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा दिपाली पाटील यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदांची माहिती देत पदे भरण्याची मागणी केली.
ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जिल्हा परिषदेतंर्गत ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १९० उपकेंद्र कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवांचा लाभ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यामातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना पर्यंत पोहोचवण्यात मोठा आधार मिळतो आहे. या विभागाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, आरोग्य व सकस आहार विषयक शिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण अशा महत्वाच्या योजना राबविल्या जातात. मात्र, आरोग्य विभागातील महत्वाच्या मानल्या जाणार्‍या अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सांख्यिकी अधिकारी या मुख्य पदांसह वैद्यकीय अधिकारी ११, आरोग्य पर्यावेक्षक ३, आरोग्य सेवक पुरुष ३२, औषध निर्माण अधिकारी ६, प्रयोगशाळा तज्ञ ४ अशी एकूण १३३ पदे रिक्त आहे. त्यात मंजुर पदांपैकी भरलेली पदे २१३ असून त्यापैकी २२ कार्मचारी हे पालघर येथे कार्यरत असल्यामुळे आहेत. त्यामुळे या २२ जाणांच्या कामाचा अतिरीक्त भार देखिल कार्यरत कर्मचार्‍यांच्या खांद्यावर येत आहे. या मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त पदांमुळे जिल्ह्याचे स्वस्थ बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याची गांभीर्याने दखल ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा दिपाली पाटील यांनी रिक्त पदे भरण्याबाबात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी निवेदनाद्वारे केली.

 549 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.