शिवशंकर चषक जय भारत सेवा मंडळाने जिंकला

शिवशंकर उत्सव मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा २०१९ -२०

सिद्धेश सावंत स्पर्धेत सर्वोत्कृष्ट

मुंबई : शिवशंकर उत्सव मंडळा आयोजित राज्यस्तरीय प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धा व शिवशंकर चषक जय भारत सेवा मंडळाने जिंकला.
अंतिम सामन्यात मुंबई शहरच्या जय भारत सेवा मंडळाने भिवंडीच्या मोरया मंडळाचा ३५-३१ असा अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात चार गुणांनी पराभव केला. मध्यंतरला तब्बल बारा गुणांनी पिछाडीवर असलेल्या मोरयाने उत्तरार्धात मात्र जोरदार मुसंडी मारत समन्याचा नुरच पालटून टाकला. मात्र शेवटपर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात जय भारताच्या खेळाडूंनी हारकिरी न पत्करता व जोश कमी होऊ न देता शिवशंकर चषकावर आपले नाव कोरले. या सामन्यात जय भारतच्या सिद्धेश सावंत व विनायक मोरे यांनी तर मोरयाच्या अजय पाटील यांनी चढाई व पक्कड करताना प्रेक्षकांची मने जिंकली.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भिवंडीच्या मोरया मंडळाने मुंबई शहरच्या बंड्या मारुती सेवा मंडळाचा २६ -२३ असा तीन गुणांनी पराभव केला तर दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई शहरच्या जय भारत सेवा मंडळाने मुंबई शहरच्याच गुड मॉर्निंग संघाचा ३६ -२१ असा एकतर्फी पराभव केला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभास मा. आमदार सुनिल शिंदे, सचिन अहिर मा. महापौर महादेव देवळे, सूरज सावंत, संदीप वरखडे, अजय पेंडुरकर शिवशंकर उत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, प्रमुख कार्यवाह जितेंद्र चव्हाण, मिलिंद परब व प्रवीण चौधरी आदि मान्यवरांसाह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 619 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.