पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रियेत धनगर समाजावर अन्याय

सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याची धनगर प्रतिष्ठानची मागणी

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व आमदारांना दिले निवेदन

ठाणे : धनगर समाजाला ३.५ टक्के आरक्षण असताना देखील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत पोलीस उपनिरीक्षक गट-ब पदाच्या भरती प्रक्रियेत एनटी-क (धनगर ) प्रवर्गाला केवळ दोन जागा देऊन समाजाची क्रूर थट्टा शासनाने केली असल्याने समस्त धनगर समाजात नाराजी पसरली आहे.याची गंभीर दखल घेऊन सदरची जाहिरात रद्द करून आरक्षणानुसार जागा देऊन पुन्हा सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी.अशी मागणी धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व आमदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर शनिवारी दुय्यम सेवा अराजपत्रित(गट-ब) साठी संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० ची जाहिरात(क्र ०५/२०) प्रसिद्ध करण्यात आली आहे.या अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रिक) पदाच्या ६५० जागांची भरती करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.एकूण ६५० जागांपैकी ४७५ जागा ह्या विविध प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.परंतु शासन निर्णयाप्रमाणे ‘भज-क'(एनटी-क) प्रवर्गासाठी सरळसेवा भरतीसाठी ३.५% जागा राखीव असतांना देखील या प्रवर्गासाठी फक्त २ जागा आरक्षित दाखवली गेली आहे. ३.५% आरक्षण आहे.त्या प्रमाणात किमान २३ जागा देण्यात आले पाहिजे असे असताना देखील फक्त २ जागा देऊन अक्षरशः धनगर समाजाची कुर चेष्टा शासनाने केली आहे यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारामध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.एनटी-क संवर्गातील उमेदवारांवर हा सरळ सरळ अन्याय असून यात तात्काळ लक्ष घालावे यासाठी धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हाअध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,नगरविकास व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे,आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे आदींना निवेदन देऊन धनगर समाजावर झाल्याला अन्याय दूर करून आरक्षणप्रमाणे जागा देऊन सुधारित जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करावी.अशी मागणी केली यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड,खजिनदार अविनाश लबडे,उपसचिव तुषार धायगुडे,समाजाचे नेते बाबासाहेब दगडे,आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि, सदरची बाब हि गंभीर असून याबाबत अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचे स्पष्ट केले.तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी बोलून त्वरित निर्णय घेऊ.असे आश्वासन दिले.दरम्यान,आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे यांनीदेखील यासंदर्भात अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.

 514 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.