गिरीश तांबे, निलम घोडकेला प्रथम मानांकन

मुंबई : २३ व्या मुंबई महापौर चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला २ मार्च रोजी दुपारी ३ वाजता दादर पूर्व येथील शारदा मंगल कार्यालय, येथे सुरुवात होत असून स्पर्धेच्या पुरुष गटात गिरीश तांबेला आणि महिला गटात निलम घोडकेला प्रथम मानांकन देण्यात आले आहे . मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार असून याप्रसंगी उपमहापौर सुहास वाडकर, स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ व रामकृष्ण लोहे, वरिष्ठ पर्यवेक्षक, शारीरिक शिक्षण विभाग, मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष श प्रदीप मयेकर हे याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात ही स्पर्धा संपन्न होणार असून एकंदर २०० खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना  एकंदर रोख ७०,००० रुपयाची पारितोषिके व महापौर चषक देऊन गौरविण्यात येईल.

स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे

पुरुष एकेरी : १) गिरीश तांबे ( मुंबई महानगरपालिका ), २) संदीप देवरुखकर ( ओ.  एन. जी. सी. ) ३) फ्रान्सिस फेर्नांडीस ( वरळी स्पोर्ट्स क्लब ), ४) झैद अहमद ( एअर इंडिया ), ५) प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ), ६) योगेश धोंगडे ( जैन इरिगेशन ), ७) विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ), ८) संदीप दिवे ( एअर इंडिया ).

महिला एकेरी : निलम घोडके ( जैन इरिगेशन ), २) उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ), ३) संगीता चांदोरकर ( रिझर्व्ह बँक ), ४) शिल्पा पळणीटकर ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ), ५) मिताली पिंपळे ( जैन इरिगेशन ), ६) समिधा जाधव ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगाव ), ७) मैत्रेयी गोगटे ( एस. एस. ग्रुप ), ८) वैभवी शेवाळे ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. . जोशी मार्ग ) 

 528 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.