…तर रूग्णालय कशासाठी चालवता

पालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागाची सुविधा नाही

पालिका आयुक्तांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना खडसावले

डोंबिवली : रुग्णालयात अतिदक्षता विभाग असणे खूप महत्वाचे आहे.मात्र डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात अतिदक्षता विभागाची सुविधा नाही. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावर नाराजी व्यक्त करत अतिदक्षता विभागाची सुविधा नाही तर रूग्णालय कशासाठी चालवता अशा शब्दात वैद्यकीय अधिकाऱ्यांना खडसावले. पुरेशी जागा नसल्याने रुग्णालयात अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध होत नाही अशी खंत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

शास्त्रीनगर रूग्णालयाला अनेक वर्ष लोटली असली तर अद्यापही या रूग्णालयात रूग्णांसाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे अतिदक्षता विभाग नसल्याने ठाणे – मुंबई येथील रूग्णालयात जावे लागते. यामुळे रूग्णांची हेळसांड होत असल्याचे पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना समजताच वैद्याकीय अधिकाऱ्यांना अतिदक्षता विभाग उपलब्ध नाही तर रूग्णालय कशासाठी चालवता असा प्रश्न उपस्थित केला. शास्त्रीनगर रूग्णालयात लवकरात लवकर अतिदक्षता विभाग तयार व्हावा यासाठी जागा उपलब्ध करावी असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. शास्त्री नगर रुग्णालयात ट्रॉमा किंवा एखादी धोकादायक शस्त्रक्रिया करायची वेळ आल्यास रूग्णाला ठाणे किंवा मुंबई येथे पाठविण्यात येते. मुळातच डॉक्टरांची संख्या कमी असल्याने कधी कधी तर डॉक्टर देखील उपलब्ध नसतात.पालिकेच्या रुग्णालयाच्या दयनीय अवस्थेची दखल आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी घेतली आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात अतिदक्षता विभागाला लागणारी साधारणत: १००० क्षेत्रफळ इतकी मोठी जागा नसल्याचे सांगितले. मात्र आजुबाजुच्या परिसरातच यासाठी जागा शोधावी लागेल अशी माहिती लवंगरे यांनी दिली.सध्या अति दक्षता विभाग उपलब्ध नसला तरी ऑपरेशन थेटरमध्ये वेगळी टरमध्ये एक खोली काढण्यात आली असून शस्त्रक्रिया झाल्यानंतर जोपर्यंत रूग्ण शुध्दीत येत नाही तोपर्यंत रूग्णाला थोड्यावेळासाठी या खोलीत ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रूग्णाला डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात येईल असेही रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सावकारे यांनी सांगितले.

 588 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.